agriculture news in marathi, Rain in Jalgaon, Dhule | Agrowon

जळगाव, धुळ्यात पुन्हा पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात धुळे व जळगावात मंगळवारी (ता. २४) अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धरणगाव, धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर भागांत पावसाने हजेरी लावली. 

जळगाव  ः खानदेशात धुळे व जळगावात मंगळवारी (ता. २४) अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धरणगाव, धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर भागांत पावसाने हजेरी लावली. 

कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. परंतु, काही भागांत सुसाट वाऱ्यासह पाऊस झाल्याने ज्वारी, कापूस, बाजरी पिकाचे अंशतः नुकसान झाले आहे. सध्या उडीद कापणी, कापूस वेचणी आणि आंतरमशागत, मशागतीची कामे सुरू आहेत. वाफसा कमी अधिक असतानादेखील शेतकरी कामे उरकून घेत आहेत. परंतु, पावसामुळे व्यत्यय येत असल्याने शेतकऱ्यांच्या कामांना फटका बसत आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघूर, गिरणासह तोंडापूर, अंजनी, अग्नावती, हिवरा, बोरी, अभोरा, मंगरूळ, सुकी आदी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर मोर, गूळ प्रकल्पाचे दरवाजेदेखील उघडे आहेत. त्यातील विसर्ग मात्र मंगळवारी कमी करण्यात आला. धुळ्यातील पांझरा, जामखेडी, बुराई, अनेर प्रकल्पांतील आवकही कमी झाल्याने त्यातील विसर्ग कमी केला. गिरणा धरणातून सोमवारी (ता. २३) सुमारे सात हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग मंगळवारी सायंकाळी कमी झाल्याचे सांगण्यात आले. 

गिरणा धरणातील आवक सोमवारी नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाल्याने वाढली होती. या धरणात चणकापूर, हरणबारी प्रकल्पांतून पाणी येत असल्याचे सांगण्यात आले. 

गेल्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः चोपडा १४, यावल ६, धरणगाव ६. धुळे ः शिरपूर ११, शिंदखेडा ७. नंदुरबार ः धडगाव २४, अक्कलकुवा २७. 
 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...