agriculture news in Marathi rain in Khandesh, Marathwada and Varhad Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारलेल्या वऱ्हाड, खानदेश, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात आलेल्या हलक्या ते मध्यम सरींनी खरीप पिकांना दिलासा दिला आहे.

पुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारलेल्या वऱ्हाड, खानदेश, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात आलेल्या हलक्या ते मध्यम सरींनी खरीप पिकांना दिलासा दिला आहे. पाणलोटात सुरू असलेल्या संततधार पावसाने लघुप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर कोयना, तिलारीसह मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तर राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

वऱ्हाडात बुधवारी (ता. ८) रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पातूर, मलकापूर, मोताळा, अकोला, नांदुरा, संग्रामपूर, खामगाव या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात या दोन दिवसांत पाऊस सक्रिय झाला आहे. तेल्हारा, संग्रामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. 

नांदेड, परभणीत अतिवृष्टी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२४ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. ९) सकाळीपर्यंत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, नांदेड, मुखेड, कंधार तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. मुखेड आणि बाऱ्हाळी मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील चिकलठाणा आणि कात्नेश्वर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील २१ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

जळगावात शेतकऱ्यांना दिलासा 
जळगाव जिल्ह्यात बुधवारी (ता. ८) रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. या भागात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मुक्ताईनगर, बोदवड, यावल, भुसावळ या भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पूर्व भागात कमी पाऊस असल्याने मका, सोयाबीन, कापूस या पिकांची स्थिती नाजूक बनत असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

सिंधुदुर्गात पूरस्थिती कायम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने पूरस्थिती कायम आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कसाल, ओरोस (ता.कुडाळ) भागाला बसला आहे. या भागातील २५ घरांमध्ये पुराचे पाणी भरल्याने बाधीत कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मुख्य मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

सांवतवाडी,कुडाळ,मालवण,कणकवली या तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. शुक आणि शांती नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे खारेपाटण शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १३ लघुप्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ८१.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागले
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने छोटे प्रकल्प भरण्यास प्रारंभ झाला आहे. गुरुवारीही पावसाची रिपरिप सुरूच होती. फाटकवाडी पाठोपाठ जांबरे (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कुंभी, रुपणी, धामणी, सरस्वती नद्या दुथडी वाहत आहेत. कोदे, अणदूर, वेसरफ हे लघुप्रकल्प  पूर्ण क्षमतेने भरले आहेत. वारणा धरणातून वीजनिर्मितीसाठी ८१५ क्‍युसेक विसर्ग सुरूच आहे. रेठरे-कोकरुड दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

साताऱ्यातही पाऊस सुरूच  
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई, सातारा या तालुक्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी या तालुक्यात पावसाचे  प्रमाण अधिक आहे. दुष्काळी तालुक्यात मात्र अगदी तुरळक पाऊस होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोटात होत असलेल्या पावसाने २४ तासांत धरणात २.१८ टीएमीसीने वाढ झाली आहे. धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

गुरूवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत 
पडलेला पाऊस, मिलिमीटर (स्त्रोतः हवामान विभाग) 

कोकण : जव्हार ३६, भिरा ६२, कर्जत ३५, महाड ५८, माणगाव ४५, माथेरान ७६, पेण ४०, पोलादपूर ६५, रोहा ४२, सुधागडपाली ४२, तळा ४९, चिपळूण ६९, दापोली ७३, गुहागर ४१, हर्णे ११३, खेड ६७, लांजा ७७, मंडणगड ७६, राजापूर ८७, रत्नागिरी ६१, संगमेश्वर ५६, देवगड ११२, दोडामार्ग ५५, कणकवली १३६, कुडाळ ६६, मालवण १४६, रामेश्वर ७७, वैभववाडी ६१, आंबरनाथ ५१, शहापूर ४८, ठाणे ५३, उल्हासनगर ७०.

मध्य महाराष्ट्र : पारनेर ४७, श्रीगोंदा ३६, जळगाव ३८, जामनेर ६४, मुक्ताईनगर ३३, आजरा ३८, गगनबावडा ९१, राधानगरी ३९, शहादा ३५, हर्सूल ३६, इगतपुरी ७०, लोणावळा कृषी ४८, वेल्हे ६६, जत ३६, महाबळेश्वर ११२, बार्शी ३८, सेालापूर ३३,

मराठवाडा : खुल्ताबाद ४२, अहमदपूर ६२, देवणी ३६, जळकोट ३०, देगलूर ४३, लोहा ४४, मुखेड ६७, उस्मानाबाद ६३, परभणी ५८, पाथरी ३१, सोनपेठ ५०, 

विदर्भ : अकोला ४०, बार्शीटाकळी ३१, मर्तिजापूर ४७, पातूर ३२, मलकापूर ३९, नांदुरा ३७, शेगाव ३०, करंजालाड ४५


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...