agriculture news in Marathi, rain in Kokan and Central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात धडाका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 जून 2019

पुणे ः कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी येथे सर्वाधिक १९४.० मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारी (ता. २८) दिवसभर या भागात पावसाचा जोर कायम होता. येत्या दोन ते तीन दिवस कोकणात संततधार पाऊस कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली केली.  

पुणे ः कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी येथे सर्वाधिक १९४.० मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारी (ता. २८) दिवसभर या भागात पावसाचा जोर कायम होता. येत्या दोन ते तीन दिवस कोकणात संततधार पाऊस कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली केली.  
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणात जोर वाढला आहे. काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असला तरी, काही ठिकाणी ७० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्यातील नडगाव येथे १८५.८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील अनेक भागांत अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. अतिवृष्टी झाल्याने ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी बरसत होत्या. तर पूर्व पट्ट्यात अनेक भागांत हवामान ढगाळ होते. खानदेशातील धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. नाशिकमधील इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे ११३.५, ताकेत, जळगावमधील अडावद, नगरमधील केडगाव, टाकळी, समशेरपूर, पुण्यामधील पुणे शहर, माले, डिंगोरे, सोलापूरमधील टेंभुर्णी, साताऱ्यातील बामणोली, हेळवाक, महाबळेश्‍वर, तापोळा, लामज कोल्हापूरमधील आंबा, गगनबावडा या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी हवामान ढगाळ असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. औरंगाबादमधील मांजरी, हर्सुल, सिल्लोड, जालन्यातील धावडा, शेवळी, सुखापुरी, घनसांगवी, जांबसमर्था, बीडमधील ढवळवडगाव, तिंतरवणी, नांदेडमधील मुखेड, तळणी, निवघा, मुदखेड, जळकोटन, गोळेगाव, परभणीमधील झरी बु., पूर्णा, मानवत, कोल्हा, हिंगोलीमधील आंबा, गोरेगाव येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

विदर्भातही हवामान अंशतः ढगाळ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. बुलडाणामधील शेलगाव, साखळी, दाताळा अमरावतीमधील धारणी, धुळघाट, सावळीखेडा, वरूड, यवतमाळमधील अकोला बाजार, जाडमोहा, लोनबेहेल, बोरगाव, खंडाळा, झाडगाव, वर्धामधील हिंगणघाट, सिरसगाव, नागपूरमधील भिवापूर, भंडाऱ्यामधील आमगाव गोंदियामधील गंगाझरी, गोंदिया, कवरबांध, चंद्रपूरमधील माधेली, तेमुर्डा, चिकनी, चांदनखेडा, मुधोळी, चिमूर, नेरी, गांभूळघाट, मासाळ गडचिरोलीतील पुराडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः
कोकण विभाग ः बलकुम ७२.५, टिटवाळा १६५.३, ठाकुरली ९०.०, नडगाव १८५.८, मुरबाड ७२.३, भिवंडी ८९.०, अंगाव ७१.०, डिघशी १२९.०, पडघा १२५.३, खारबाव १०१.३, शहापूर ९५.०, किनहवळी १३०.०, वसींड ९९.९, डोलखांब ७१.८, अंबरनाथ ८७.८, चौल ११२.५, रामरज ९८.०, पाली १०६.०, जांभूळपाडा ११८.५. कसू ८३.८,महाड ११५.३, बिरवडी १५२.३, करंजवडी १२६.०, नाटे ९७.०, खारवली १२५.८, तुडली १३४.३. इंदापूर १२०.०, गोरेगाव ९३.८, लोनेरे ९३.०, निझामपूर १०८.०, रोहा ७९.५, नागोठणे ७२.३, चानेरा १२९.८, कोलाड ७४.८, पोलादपूर ९५.०, कोंडवी १४४.५, वाकण ११४.८, मुरूड १६५.०, नांदगाव १०३.८, बवरली ८१.३, श्रीवर्धन १०१.५, वालवटी ९६.०, म्हसला ९९.३, तला १३२.३, मेंढा ७१.८, चिपळूण ८४.५, खेर्डी ९०.८, मार्गताम्हाणे १००.५, रामपूर ८८.०, वहाळ १३७.०, सावर्डे १४३.३, असुर्डे १४७.०, कळकवणे १०५.५, शिरगाव १४९.८, दापोली १७३.८, बुरोंडी १९४.०, दाभोळ ९२.०, आंजर्ले १३४.५, वाकवली १७०.३, पालगड १२०.०, वेळवी १४१.५, खेड १४६.३, शिर्शी १००.३, आंबवली १०३.३, कुळवंडी ११३.०, भरणे १३३.८, दाभीळ ११८.५, धामणंद ९२.३, गुहाघर १४०.५, तळवली १११.३, पाटपन्हाळे १३७.८, आबलोली १३७.८, हेदवी १४५.५, मंडणगड १२१.५, म्हाप्रळ ११६.३, देव्हारे १२७.३, रत्नागिरी ८७.३, खेडशी ११२.५, पावस ८१.०, जयगड ९२.५, कोतवडे ८१.५, पाली १०५.५, कडवी १०९.३, मुरडव १३२.५, माखजन १२५.५, फणसवणे ९५.०, कोंडगाव ८२.०, देवळे ११५.५, देवरुख ९४.५, तुळसानी ८८.५, माभळ ७५.०, तेर्ये ७१.५, सौंदळ ९०.८, कोंडये ८७.३, कुंभवडे ८४.३, ओणी १६५.५, पाचल १०१.३, लांजा ८७.३, भांबेड ९४.३, पुनस ८३.३, विलवडे ९८.०, मीतबंब १०९.३, शिरगाव ९४.०, पाटगाव १०५.३, बापरडे १६१.०, श्रावण ७९.८, पोइप ७२.०, सावंतवाडी १०५.३, वेंगुर्ला ७६.३, शिरोडा ७०.८, फोंडा ८०.८, तालेरे १००.८, वैभववाडी १३०.५, येडगाव १११.०, मांडवी १०४.८, कांचगड ७३.८, जव्हार ९१.०, खोडला ८२.५,

मध्य महाराष्ट्र ः इगतपुरी ८९.५, घोटी ९४.०, वाडीवऱ्हे ११३.५, ताकेत ९२.५, त्रिंबकेश्‍वर ६८.५, साकळी ४०.०, अडावद ५३.५, केडगाव ४०.०, जेऊर ३०.३, टाकळी ४२.८, समशेरपूर ४४.५, पुणे शहर ५२.८, हडपसर ४५.३, थेरगाव ४९.५, माले ५३.५, मुठे ४३.०, भोर ३०.८, भोलावडे ४९.८, नसरापूर ३१.८, आंबवडे ३१.५, संगमनेर ३४.५, निगुडघर ३१.०, वेल्हा ३५.०, पाणशेत ३६.०, विंझर ४३.३, अंबावणे ४४.८, डिंगोरे ५४.५, आंबेगाव ३५.८, टाकळी ३३.०, उंडवडी ४८.०, राजेवाडी ३९.५, टेंभुर्णी ३३.३, परळी ४०.३, बामणोली ६२.०, हेळवाक ६९.८, महाबळेश्‍वर १३०.३, तापोळा ५५.५, लामज ५२.३, करंजफेन ४३.५, आंबा ६६.०, राधानगरी ३७.०, सरवडे ३६.३, कसबा ३४.३, आवळी ३३.५, गगनबावडा १०३.३, साळवण ५५.८, हेरे ५४.८.

मराठवाडा : मांजरी ६९.९, वाळूज ४२.३, हर्सूल ५८.०, सिल्लोड ४८.५, अजिंठा २९.०, वाडोदबाजार ३१.२, धावडा ४७.०, शेवळी ३७.०, सुखापुरी ३०.०.घनसांगवी ३९.५,जांबसमर्था ६७.८, झरी बु. ३२.३, पिंगळी २४.३., पुर्णा ३२.०, मानवत ३०.३, कोल्हा ३०.०, गोरेगाव ३१.०,

विदर्भ ः शेलगाव २६.३, साखळी २७.०, दाताळा ३०.०, धारणी १०८.०, धुळघाट ४३.८, सावळीखेडा ५२.८, वरूड ५९.८, अकोलाबाजार ३२.५, जाडमोहा ३६.०,
लोनबेहेल ६८.५, बोरगाव ४३.३, खंडाळा ६३.०, झाडगाव ५२.०, हिंगणघाट ६८.३, सावळी ३२.०, सिरसगाव ५१.०, निंदोरी ३३.५, भिवापूर ४८.३, कुही २०.५,
आमगाव ६४.३, गंगाझरी ४२.०, गोंदिया ४५.५, कवरबांध ५३.३, माधेली ५६.०, तेमुर्डा ११९.३, चिकनी ५२.५, चांदनखेडा ५५.०, मुधोळी ५२.५, चिमूर ८४.०,
नेरी ६९.८, गांभूळघाट ६६.३, मासाळ ६६.०. पुराडा ५०.०.

मॉन्सूनची गुजरात, मध्य प्रदेशात प्रगती
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २८) गुजरात, मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. द्वारका, अहमदाबाद, भोपाळ, जबलपूरपर्यंत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. १ ते ३ जुलैपर्यंत मॉन्सून देशाच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे.

राज्यभरात पावसाची हजेरी

  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी 
  • ओढे, नाले दुथडी भरून वाहिले. 
  • मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
  • खानदेशातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस
  • मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी 
  • पावसामुळे दुष्काळी भागाला दिलासा

१५० मिलिमिटरपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे
कोकण ः  बुरोंडी १९४.०, नडगाव १८५.८, दापोली १७३.८, वाकवली १७०.३, ओणी १६५.५, टिटवाळा १६५.३ , मुरूड १६५.०,   बापरडे १६१.०, बिरवडी १५२.३.
 


इतर अॅग्रो विशेष
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...