agriculture news in Marathi rain in Kokan, central Maharashtra and Marathwada Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणवू लागला आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमीच्या सरींनी हजेरी लावली आहे.

पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जाणवू लागला आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमीच्या सरींनी हजेरी लावली आहे. उन्हाचा झळा कमी होऊन हवेत गारवा आला आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, उन्हाळी पिकांना तसेच खरीपाच्या तयारीला हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात वादळाचा अधिक प्रभाव जाणवत असून, किनारपट्टीलगत ढगांची दाटी झाली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने आंबा, काजू पिकांना फटका बसणार आहे. पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्टात भात रोपवाटिकेच्या कामांना, तर पूर्व पट्यातही नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

सांगली जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा मॉन्सूनपूर्व पाऊस पडला. पश्चिम भागात दमदार तर पूर्व भागात संततधार सरींची बरसात झाली. शिराळा, वाळवा तालुक्‍यात दमदार पाऊस पडला. पाऊस उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात अनेक भागात आडसाली ऊसाच्या लागवडी झाल्या आहेत. या उसाला संजीवनी मिळणार आहे. 

सातारा जिल्ह्यातही सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. खरिपाच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्याने पेरणी पूर्व कामांना गती येणार आहे. सातारा, कराड, जावळी, पाटण, खटाव, माण, महाबळेश्वर याही तालुक्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यात पाऊस झाल्याने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले असले तरी खरिपाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. ऊस, आले लागवडीसह पेरणीपूर्व कामांना गती येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस पडला. खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. माळशिरस, पंढरपूर, बार्शी, सांगोला, करमाळा व माढा तालुक्यातही पावसाचा पुन्हा जोर राहिला. 

मराठवाड्याला तडाखा 
मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. पावसामुळे शेतशिवारांत खरीप पेरणीपूर्व कामांची लगबग सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा या तालुक्यात, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम या तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक होता. वादळासह झालेला हा पाऊस आंबा डाळिंब पिकाचे काही ठिकाणी नुकसान करून गेला. पावसाने खरीप पेरणीसाठी शेत शिवारातील लगबग वाढली आहे. 


इतर बातम्या
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
ग्लायफोसेटच्या थेट वापरावर बंदीच्या...पुणे: अलीकडील वर्षांत सातत्याने चर्चेत असलेल्या...
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...