agriculture news in Marathi, rain in Kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात पावसाचा जोर; मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 जून 2019

पुणे: ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाने जोर धरला आहे, तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. १३) मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे; तर विदर्भ आणि मराठवाड्यात असलेली उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समुद्रातील वायू वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी झाली आहे. खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या किनाऱ्याला तडाखा बसला आहे. मंगळवारी रात्रीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढला आहे.

पुणे: ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाने जोर धरला आहे, तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. १३) मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे; तर विदर्भ आणि मराठवाड्यात असलेली उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समुद्रातील वायू वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी झाली आहे. खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या किनाऱ्याला तडाखा बसला आहे. मंगळवारी रात्रीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढला आहे.

समुद्राच्या उंच लाटा उसळत असून, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसले, त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थंलातरित करावे लागले. बहुतांशी भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यात पाऊस सुरू होता. बुधवारी सकाळपासून मुंबईसह कोकणात पाऊस वाढला होता. 

वादळामुळे आज (ता. १३) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबईतही पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावात वादळी पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर आणि साताऱ्यातही हलका पाऊस शक्य आहे. विदर्भात सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट असून, बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्ण लाट होती. आज (ता. १३) विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता आहे.    

बुधवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.५ (४.३), जळगाव ४३.४ (४.४), कोल्हापूर ३३.१ (२.६), महाबळेश्वर २७.४ (४.१), मालेगाव ४१.८ (५.४), नाशिक ३७.० (३.०), सांगली ३३.४ (१.५), सातारा ३५.२ (४.३), सोलापूर ३७.६ (२.१), अलिबाग ३५.८ (३.८), डहाणू ३६.५ (३.१), सांताक्रूझ ३४.६ (२.०), रत्नागिरी ३५.८ (५.१), औरंगाबाद ३८.६ (३.३), परभणी ४२.२ (४.४), नांदेड ४२.० (४.४), अकोला ४४.५ (६.१), अमरावती ४४.२ (५.८), बुलडाणा ४१.२ (६.२), ब्रह्मपुरी ४५.३ (६.६), चंद्रपूर ४६.२ (७.१), गोंदिया ४६.० (६.५), नागपूर ४४.९ (५.८), वर्धा ४५.० (६.८), यवतमाळ ४४.० (५.९). 

बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : 
कोकण : भिरा, माथेरान प्रत्येकी ४०, राजापूर, कुलाबा प्रत्येकी ३०, खालापूर, रोहा, सुधागड, पाली प्रत्येकी १०. 
मध्य महाराष्ट्र : सिन्नर ३०, इगतपुरी, येवला, जावळी, मेढा प्रत्येकी २०, महाबळेश्वर, जामखेड, हर्सुल, त्रिंबकेश्वर, दहिवडी, कोरेगाव, गगनबावडा प्रत्येकी १०. 
मराठवाडा : निलंगा, पाटोदा प्रत्येकी ३०, वैजापूर, गंगाखेड प्रत्येकी २०, कळमनुरी, सोनपेठ प्रत्येकी १०.

इतर अॅग्रो विशेष
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...