agriculture news in Marathi, rain in Kokan, Maharashtra | Agrowon

तळकोकणात जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 जून 2019

पुणे ः मॉन्सूनचे कोकणच्या दक्षिण भागात आगमन होत असताना या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक मंडळात मुसळधार पाऊस पडला असून सुमारे ५० मंडळात अतिवृष्टी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे आंब्याचे, भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 

पुणे ः मॉन्सूनचे कोकणच्या दक्षिण भागात आगमन होत असताना या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक मंडळात मुसळधार पाऊस पडला असून सुमारे ५० मंडळात अतिवृष्टी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे आंब्याचे, भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 

 कोकणच्या दक्षिण भागात मॉन्सूनची गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिली होती. बुधवारी (ता.१९) व गुरुवारी (ता.२०) दिवसभर या भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातही हवामान अंशत ढगाळ होते. मात्र, मॉन्सून कोकणच्या दक्षिण भागात जवळपास आल्यानंतर अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील नांदगाव, तालेरे, वागडे, कुडाळ, वैभववाडी येडगाव, भुईबावडा, वेंगुर्ला,  राजापूर, कोंडिया, जैतापूर, कुंभावडे, ओनी, भांभेड, सातवली, विलवडे, पाडेल, देवगड, पाडेल, मीथाबांब, शिरगाव, पाटगाव, बापर्डे, मालवण, मासुरे या मंडळात अतिवृष्टी झाली. तर ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतही पावसाने तुरळक ठिकणी हजेरी लावली. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता 
मॉन्सूनचे तळकोकणात आगमन झाल्यानंतर राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हवामान हलक्या पावसाचा अंदाज असून पुणे परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

गुरुवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः स्त्रोत ः कृषी विभाग   
कोकण विभाग ः मरगतम्हाणे ३५, रामपूर ३०, सावरडे ६५, असुरडे ५०, शिरगांव ३८, दापोली ९४, बुरवंडी ६५, अंजरला ८५, वाकवली ९०, पालगड ९३, वेलवी ६७, खेड ३२, ३८, पातपान्हले ६०, अबलोली ५०, हेडवी ५५, मंडणगड ३८, रत्नागिरी ९९, खेडशी १०४, पावस १२८, जायगड ९२, फनसोप १२७,  कोटवडे ७२, मलगुंड ९८, तरवाल ७९, पाली ९२, कडवी ३५, खामजान ४०, फुंगूस ३५, फनसावणे ७३, अंगवली ८५, कोडगाव ३९, देवली ४१, देवरुख ४५, तुलसानी ४०, माभले ४५, तेरहे ५८, राजापुर १६२, सौंदल ७४, कोंडिया १७७, जैतापूर २००, कुंभावडे ७९, नाते ५५, ओनी १०५, पाचल ६९, लांजा १२०, भांबेड १०९, पुनस ६६, सातवली ११०, विलवडे ११५, देवगड १२०, पाडेल १२०, मीथाबांब १२०, शिरगाव १४८, पाटगाव १७५, बापरर्डे १४३, मालवण १०४, पेंदूर ५९, मासूरे ८२, श्रावण ९२, 
आचरा १६३, अंबेरी ४६, पोयीड ५६, बांडा ४५, आजगाव ८०, वेंगुर्ला ९६, मापून १०८, कनकवली १२१, फोंडा ९२

मध्य महाराष्ट्र ः उंबरठाणा २.१, सुरगाणा २.१, इगतपुरी ५, घोटी १३, हरसूल ४, कर्जत ६.५, बाभोंरा ९, कोम्बाळी ३, शेंडी १०, मुठे १२, वेळू ५, संगमनेर ६, निगुडघर ४, लोणावळा १५, वेल्हा ८, पानशेत ७, आंबावणे १३, देऊळगाव १७, दौड ८, भिवंडी २, सांगोला १२, जवळा १८, सांगेवाडी १२, इस्लामपूर १०, महाळुंग १७, वेलापूर २०, मारापूरू १०, हेळवाक २०, मारली २२, कराड ११, कोळे ७, कोपार्डे हवेली ८, महाबळेश्वर २१, तापोळा १६.४, लामज २१, कुरलाप १५, पेठ ४, इस्मालपूर ६, शिरशी १४, सागव १९, दिघाची २०, आटपाडी १९, अंकलखोप ११, हेराळे ८, वाडी रत्नागिरी १६, बाजार १२, भेडसगाव १४, बांबवडे १७, करंजफेन३०, मलकापूर १८, आंबा ४८, राधानगरी ३८, कसबा ३५, गगनबावडा ११८,सालवन ४२, करवीर १५, आवली १२, निगावे २५, सांगरूळ २१, शिरोली धुमाला २०, बालिंगे २३, केनवडे १३, खडकेवाड १६, गवसे १८, कराडवाडी १२, गारगोटी १७, हेरे १७

मराठवाडा ः तुळजापूर १५, नळदुर्ग १०, 
विदर्भ ः सावलीखेडा १२.४, सेमडोह २.४, राजूर २, 
 
गुरुवारी (ता.२०) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :
 पुणे २९.६ (-१.५), जळगाव ३७.० (-०.५), कोल्हापूर २९.१ (०.१), महाबळेश्‍वर २०.४ (-१.७), मालेगाव ३७.६ (२.५), नाशिक ३२.३ (-०.४), सांगली ३०.३ (-०.३), सातारा २८.९ (-०.६), सोलापूर ३६.८ (३.०), मुंबई (सांताक्रुझ) ३२.६ (०.७), अलिबाग ३२.० (०.९), रत्नागिरी ३०.१ (०.२), डहाणू ३१.९ (-०.६), औरंगाबाद ३३.२ (-०.३), नांदेड ३९.५ (३.१), परभणी ३८.५, उस्मानाबाद ३५.१ (३.४), अकोला ३८.४ (१.५), अमरावती ३९.४ (२.५), बुलढाणा ३५.६ (२.३), ब्रह्मपुरी ४३.१ (६.२), चंद्रपूर ४२.६ (५.५), गोंदिया ४०.५ (२.९), नागपूर ४२.६ (५.२), वाशीम ३९.०, वर्धा ४१.० (४.१), यवतमाळ ४०.० (४.०).


इतर अॅग्रो विशेष
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...