Rain in Latur, floods in Terna
Rain in Latur, floods in Terna

लातूरमध्ये पाऊस,‘तेरणा’ला पूर

औरंगाबाद : औरंगाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील सहा मंडळांत मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद, बीड व लातूर जिल्ह्यातील सहा मंडळांत मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. तर, उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक मंडळातही मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागली. लातूर जिल्ह्यात तेरणा नदी दुथडी भरुन वाहू लागली.

लातूर जिल्ह्यातील देवणी मंडळात ८४.५ मिलिमीटर, तर बोरोळ मंडळात सर्वाधिक १२७.५ मिलिमीटर पाऊस झाला. इतर ४५ मंडळांत हलका पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगी मंडळात ८२.५ मिलिमीटर, तर वेरूळ मंडळात ७३ मिलिमीटर पाऊस झाला. इतर मंडळात मध्यम पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ५२ मंडळात हजेरी लावली. दासखेड मंडळात ६६.३ , तर लिंबागणेश मंडळात ९६.३ मिलीमीटर पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ मंडळांत पाऊस झाला. जालना जिल्ह्यात पंधरा मंडळांत पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात तेरणा नदी दुथडी भरुन वाहू लागली.  बाजारसावंगी ८२.५, वेरूळ ७३, देवणी८४.५, बोरोळ १२७.५, दासखेड ६६.३, लिंबागणेश ९६.३ या मंडळांत अतिपाऊस झाला.

परभणी, हिंगोलीतील ५६ मंडळांत पाऊस

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५६ मंडळांत मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले आहे. सांडव्यावरुन १५ सेमी पाणी ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील ३३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com