कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 

दोन्ही समुद्रांत तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे.
Rain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
Rain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra

पुणे : दोन्ही समुद्रांत तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  सोमवारी (ता.१५) दुपारनंतर सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सिंधुदुर्गमधील कणकवली येथे ३० मिलिमीटर, वेंगुर्ला येथे १० मिलिमीटर, सोलापुरातील मंगळवेढा येथे २०, तर सांगोला येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.    पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर गेले आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळी निफाड येथे नीचांकी १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३५.७ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. 

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३२.६ (२०.६), नगर ३२.२ (२२.५), जळगाव ३२.७ (१८), कोल्हापूर ३१.२ (२३.१), महाबळेश्‍वर २५.१(१८.६), नाशिक ३१.८ (१८.४), निफाड ३०.१ (१७.२), सांगली ३२.८ (२५), सातारा ३०.४ (२३), सोलापूर ३४.२ (२१.८), सांताक्रूझ ३५.२ (२५.४), डहाणू २९.८ (२३.२), रत्नागिरी ३५.७ (२६.३), औरंगाबाद ३१.४ (१८.४), नांदेड ३०.४ (२२), परभणी ३१.८ (२१.०), अकोला ३३.५ (२१.३), अमरावती ३१.६ (१८.५), ब्रह्मपुरी ३४ (२१), बुलडाणा ३०.५ (१८.५), चंद्रपूर ३१ (२२.२), गडचिरोली २९.४ (२२.२), गोंदिया ३१ (२०), नागपूर ३२.२ (१९.४), वर्धा ३१.० (२०.०), वाशीम ३५.५ (२०), यवतमाळ ३०.५ (१९.५). 

दोन्ही समुद्रांत कमी दाबाची क्षेत्रे  बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्ही किनाऱ्यांलगत कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, पश्‍चिमेकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, गुरुवारी (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वरील दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com