माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊस

सोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात वादळवारे आणि मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माढा, पंढरपूर भागात हा पाऊस झाला.
Rain to Madha, North Solapur, Akkalkot
Rain to Madha, North Solapur, Akkalkot

सोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात वादळवारे आणि मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माढा, पंढरपूर भागात हा पाऊस झाला. 

दिवसभर कडाक्याचे ऊन होते. सायंकाळनंतर वातावरणात एकदम बदल झाला. त्यानंतर पावसाला सुरवात झाली. वादळवाऱ्यासह हा पाऊस सुरु झाला. अक्कलकोट येथील वसंतराव नाईकनगर येथे वीज कोसळून विश्वनाथ गोपाळ राठोड यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. यामध्ये वाऱ्याचा वेग खूप होता. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस पडला. जोराचा पाऊस व वाऱ्यामुळे या भागात काही घरांचे व शेतीचे नुकसान झाले.

त्याशिवाय तालुक्यातील वागदरी, दुधनी, तडवळ, हन्नूर, मैंदर्गी भागातही पाऊस पडला.  माढा तालुक्यातही काही भागात पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला पावसाची सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. 

म्हैस, गाय दगावली

मानेगाव येथे वीज कोसळून गणपती नागनाथ माळी यांची एक म्हैस, तर योगीराज बाळासाहेब देशमुख यांची एक गाय दगावली. तर उपळाई येथे काही घरावरील पत्रे उडाले. उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा, कारंबा, गुळवंची परिसरातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षाही वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेकांची तारांबळ उडाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com