agriculture news in marathi Rain to Madha, North Solapur, Akkalkot | Page 2 ||| Agrowon

माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

सोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात वादळवारे आणि मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माढा, पंढरपूर भागात हा पाऊस झाला. 

सोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात वादळवारे आणि मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माढा, पंढरपूर भागात हा पाऊस झाला. 

दिवसभर कडाक्याचे ऊन होते. सायंकाळनंतर वातावरणात एकदम बदल झाला. त्यानंतर पावसाला सुरवात झाली. वादळवाऱ्यासह हा पाऊस सुरु झाला. अक्कलकोट येथील वसंतराव नाईकनगर येथे वीज कोसळून विश्वनाथ गोपाळ राठोड यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. यामध्ये वाऱ्याचा वेग खूप होता. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस पडला. जोराचा पाऊस व वाऱ्यामुळे या भागात काही घरांचे व शेतीचे नुकसान झाले.

त्याशिवाय तालुक्यातील वागदरी, दुधनी, तडवळ, हन्नूर, मैंदर्गी भागातही पाऊस पडला. 
माढा तालुक्यातही काही भागात पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला पावसाची सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. 

म्हैस, गाय दगावली

मानेगाव येथे वीज कोसळून गणपती नागनाथ माळी यांची एक म्हैस, तर योगीराज बाळासाहेब देशमुख यांची एक गाय दगावली. तर उपळाई येथे काही घरावरील पत्रे उडाले. उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा, कारंबा, गुळवंची परिसरातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षाही वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेकांची तारांबळ उडाली.


इतर बातम्या
जीएम तंत्रज्ञानासाठी  गावांनी घ्यावेत...यवतमाळ : सर्वच क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
विदर्भात पावसाने गाठली सरासरी नागपूर : सप्टेंबरच्या पूर्वार्धात वरुणराजाची...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
घरगुती नळजोडणीची  कामे कालमर्यादेत करा...पुणे : जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व...
सांगलीत वीजेची थकबाकी  ४२१ कोटी...सांगली : राज्यातील ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत तीन...
खरीप पेरणी क्षेत्रात  १४ हजार हेक्टरने...पुणे : खरीप हंगामात सुरूवातीच्या काळात कमी...
नाशिक जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगामुळे...नाशिक : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा...
बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देऊ : मलिकपरभणी : ‘‘जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी व...
अमळनेरमधील पांणंद रस्त्यांचे प्रस्ताव...वावडे, ता. अमळनेर : ‘शेत तिथे पांदण रस्ता’ ही...
आंब्याच्या नुकसानीसाठी विमा भरपाई...हडोळती, ता. अहमदपूर ः सन २०१९ - २०२० साली आंबा...
जळगावात रब्बीचा पेरा दीड लाख हेक्टरने...जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात यंदा गाळपासाठी अडीच...सोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या ऊसगाळप हंगामाला...
दीड लाख शेतकऱ्यांची जिल्ह्यात ई-पीक...सोलापूर ः शासनाने यंदापासून नव्याने सुरु केलेल्या...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...