नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस

नंदुरबारः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.
Rain in many parts of Nandurbar
Rain in many parts of Nandurbar

नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. 

पावसाने १० ते ११ दिवसांपासून दडी मारली होती. कापूस, कडधान्य, तृणधान्य पिके संकटात होती. पपईलाही सिंचन करावे लागत होते. रोज कडक ऊन पडत होते. यामुळे जमिनीतील वाफसा नष्ट झाला. खते दिली होती, परंतु, पाऊस न आल्याने त्यांचा चांगला किंवा कार्यक्षम उपयोग पिकांसाठी झाला नाही. अशात पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

अनेक शेतकऱ्यांनी मूग, उडीद, कापूस पिकात सिंचन सुरू केले होते. जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ५० पर्यंत पोचली आहे. परंतु, अक्कलकुवा, धडगाव या सातपुडा पर्वतालगतच्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी आहे. या भागात वृक्षराजी आहे. चांगला पाऊस या भागात होत असतो. या भागातील उदय, खरडी नदीलाही चांगला पूर आलेला नाही. नवापुरात मध्यंतरी पिके संकटात होती. त्यानंतर पाऊस झाला. पुन्हा १२ दिवस पावसाचा खंड होता. 

जिल्ह्यात दरवर्षी ११०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होत असतो. यंदा पावसाळा अर्धा संपला. परंतु, पाऊस हवा तसा नसल्याने सरासरी गाठेल, की नाही असा प्रश्न आहे. शहादा तालक्यात अनेक भागात अत्यल्प पाऊस झाल्याची माहिती मिळाली. पाऊस (मिलीमीटरमध्ये) ः नंदुरबार ३३, नवापूर १०, तळोदा ५५, शहादा ०७, अक्कलकुवा २८, धडगाव १०.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com