agriculture news in marathi, rain in many parts of Satara | Agrowon

साताऱ्याच्या अनेक भागांत संततधार

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जुलै 2019

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी (ता. २६) सर्वत्र संततधार पाऊस झाला. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात कमी-अधिक स्वरूपात त्याने हजेरी लावली. जिल्ह्यात शनिवारपर्यंतच्या (ता. २७) २४ तासांत एकूण सरासरी ६३.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी (ता. २६) सर्वत्र संततधार पाऊस झाला. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात कमी-अधिक स्वरूपात त्याने हजेरी लावली. जिल्ह्यात शनिवारपर्यंतच्या (ता. २७) २४ तासांत एकूण सरासरी ६३.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असतानाच शुक्रवारी संततधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू आहे. नद्या, नाले, ओढे दुधडी भरून वाहू लागले आहेत. अनेक शेतात पाणी साचले आहे. पावसाअभावी संथ झालेल्या भात लावणीस वेग येण्यास या पावसाची मदत होणार आहे. महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा, वाई, कराड या तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. या सर्व तालुक्यांत ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.

कोरेगाव, खंडाळा, खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. तसेच, माण व फलटण तालुक्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. एकूणच, शुक्रवारी झालेला पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला. त्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. कोयना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे.  या धरण क्षेत्रातील कोयना २३७, नवजा २७१, महाबळेश्वर भागात २०४ मिलिमीटर पाऊस झाला.

कोयना धरणाची पाणीपातळी २११७.०१ फूट झाली. ५८.६७ टीएमसी एवढा पाणीसाठा त्यात झाला आहे. इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. शनिवारीही दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरू असल्याने शेतातील कामे ठप्प झाली.  

तालुकानिहाय पाऊस (मिमी) 

सातारा ८४.५८ 
जावळी ८७.६८ 
पाटण ११०.९१
कराड ५९.३८
कोरेगाव ३४.७८
खटाव २२.६७
 माण ३.८६ 
 फलटण ११.३३
 खंडाळा ३६.७०
 वाई ६१.७१
  महाबळेश्वर २५२.१०.

 


इतर ताज्या घडामोडी
नगर : शेतकरी घरीच तपासत आहेत सोयाबीन...नगर  ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा...
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सुरू...पुणे  : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू...
लग्नासाठी पन्नास व्यक्तींच्या...नगर  ः कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे...
परभणी, हिंगोलीत २८ हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
कृषी पदव्युत्तरच्या ऑनलाइन परीक्षेचा...पुणे  ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर...
कोल्हापुरात विमा योजनांच्या नूतनीकरणास...कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार बँक...
निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त...परभणी ः परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न...
महापुराच्या मुकाबल्यासाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांसाठी...
‘पंदेकृवि’ची उद्या राज्यस्तरीय कापूस...अकोला : लवकरच खरीप हंगाम येऊ घातला आहे. राज्याचा...
फुले कृषी विद्यापिठाकडून व्हॉट्सअॅपवर...पुणे (प्रतिनिधी) ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ...
हमीभावासाठी अंगाला हळद लावून आज आंदोलन...वाशीम: हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या...
वातावरणातील बदलाचे रोगकिडीवर होणारे...वातावरणातील घटकांचे ज्या प्रमाणे मानवावर परिणाम...
कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर...कोल्हापूर: कोरोनापेक्षा घातक व्हायरस टोमॅटोवर...
अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार...अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया...
जळगावात एक क्विंटल कापसामागे चार किलोची...जळगाव : एक क्विंटल कापसामागे चार किलो कापसाची...
‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी माजी...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
अकोला झेडपी शेतकऱ्यांना अनुदानावर देणार...अकोला  ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल...
नगर जिल्ह्यात ७१ हजार ६६५ क्विंटल तूर...नगर  ः नगर जिल्ह्यात नाफेडने सुरु केलेल्या...
खानदेशात गोदामांअभावी मका खरेदीला विलंब...जळगाव  ः खानदेशात मक्‍याच्या शासकीय...
औरंगाबादमध्ये १६७५ टन खते, ६० क्विंटल...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...