मराठवाड्यात पावसाने रब्बीसाठी दिलासा मिळणार

मराठवाड्यात पावसाने रब्बीसाठी दिलासा
मराठवाड्यात पावसाने रब्बीसाठी दिलासा

औरंगाबाद :  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी २०१ मंडळांत गुरुवारी(ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. हलका मध्यम, तर काही मंडळांत दमदार पाऊस बरसला. औरंगाबाद जिल्ह्यातील लोणी मंडळात सर्वाधिक ८६ मिलिमिटर पाऊस झाला. काही तालुक्‍यांकडे मात्र पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र पहायला मिळाले. हा पाऊस रब्बीसाठी काहीप्रमाणात दिलासादायक ठरला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५६ मंडळांत पाऊस झाला. हलका, मध्यम ते दमदार स्वरूपाचा हा पाऊस राहिला. वैजापूर तालुक्‍यातील लोणी मंडळात सर्वाधिक ८६, औरंगाबाद मंडळात २१ मिलिमीटर, उस्मानपूरा ३५, चित्तेपिंपळगाव ३२, करमाड ४३, हर्सूल ५०, फूलंब्री २१, आळंद २५, पिरबावडा २२, बिडकीन ३९, लोहगाव २८, सिल्लोड ३२, भराडी ३२, सावलदबारा ५८, नागमठाण २६, वाळूज २१, शेंदूरवादा २९, तुर्काबाद ३४, कन्नड २०, नाचनवेल ३६, तर चिंचोली लिंबाजी येथे २६ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते २० मिलिमिटर पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ मंडळांत मध्यम पाऊस झाला. जालना ग्रामीण मंडळात २६ मिलिमिटर, सेवली २५, बदनापूर २९, दाभाडी २४, भोकरदन ३४, सिपोरा बाजार ३०, धावडा ५२, पिंपळगाव रेणूकाई ३४, हसनाबाद ४७, केदारखेडा ३९, माहोरा २०, आष्टी २८, ढोकसाल ३२, तळणी २७, धनगरपिंप्री २०, राणी उंचेगाव २५ मिलिमिटर, तर उर्वरित मंडळांत १ ते २० मिलिमिटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४६ मंडळांत हलका पाऊस झाला. नाळवंडी मंडळात ३६ मिलिमिटर, म्हळसजवळा ३७, धामणगाव २८, दौलावडगाव ३२, सिरसदेवी ३५, वडवणी ३५, वीडा २० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळांत १ ते १९ मिलिमिटर पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील औसा, शिरूर, अनंतपाळ तालुक्‍यांकडे पावसाने पाठ फिरविली. ५३ पैकी २२ मंडळांतच तुरळक स्वरूपाची हजेरी लावली. चाकूर तालुक्‍यातील शेळगाव मंडळांत ४३ मिलिमिटर पाऊस झाला. उर्वरित सर्व मंडळांत १ ते २० मिलिमिटर दरम्यान पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ मंडळांपैकी ३१ मंडळांत हलका पाऊस झाला. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंत तुळजापूर, उमरगा तालुक्‍यांत जोरदार बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळपर्यंत तुरळक हजेरी लावली. कळंब मंडळात सर्वाधिक ३७ मिलिमिटर, त्यापाठोपाठ परंडा मंडळात ३०, शरधोन २७ मिलिमिटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते २२ मिलिमिटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com