मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता 

कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्यापासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट व गारपीटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  गेली तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली चक्रिय वाऱ्याची स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे वातावरण काहीसे निवळले असले तरी दुपारनंतर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर दिवसभर उन्हाचा चटका वाढून झळा तीव्र होत आहेत. मागील दोन ते तीन दिवस पावसामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली होती. मात्र, ढगाळ वातावरण निवळल्याने कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळी चोवीस तासात खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.  सध्या दक्षिण केरळ ते उत्तर कर्नाटक व परिसर दरम्यान कमी दाबाच्या पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसर ते आसाम, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमालय, पश्चिम बंगालपर्यंत चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तर उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच बदल असून कमाल व किमान तापमानातही चढउतार होत आहे. तर, काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, संपूर्ण विदर्भ  गुरुवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ  शुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र  शनिवार ः संपूर्ण महाराष्ट्र,  ---------------------------  मंगळवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३६.१ 
  • अलिबाग ३६.१ 
  • रत्नागिरी ३५.२ 
  • डहाणू ३५.२ 
  • पुणे ३६.१ 
  • जळगाव ४१.२ 
  • कोल्हापूर ३५.१ 
  • महाबळेश्वर २८.८ 
  • मालेगाव ३९.० 
  • नाशिक ३६.९ 
  • सांगली ३६.८ 
  • सातारा ३५.१ 
  • सोलापूर ३९.२ 
  • औरंगाबाद ३७.२ 
  • परभणी ३७.५ 
  • बीड ३९.३ 
  • नांदेड ३९.० 
  • अकोला ४१.१ 
  • अमरावती ३९.४ 
  • बुलडाणा ३७.५ 
  • ब्रम्हपुरी ४०.३ 
  • चंद्रपूर ३९.४ 
  • गोंदिया ३८.८ 
  • नागपूर ३९.५ 
  • वर्धा ४०.५ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com