agriculture news in Marathi rain may increased in Marathwada and Vidarbha Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्यापासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट व गारपीटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेली तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली चक्रिय वाऱ्याची स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे वातावरण काहीसे निवळले असले तरी दुपारनंतर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर दिवसभर उन्हाचा चटका वाढून झळा तीव्र होत आहेत. मागील दोन ते तीन दिवस पावसामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली होती.

मात्र, ढगाळ वातावरण निवळल्याने कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळी चोवीस तासात खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. 

सध्या दक्षिण केरळ ते उत्तर कर्नाटक व परिसर दरम्यान कमी दाबाच्या पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसर ते आसाम, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमालय, पश्चिम बंगालपर्यंत चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तर उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच बदल असून कमाल व किमान तापमानातही चढउतार होत आहे. तर, काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
बुधवार ः
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, संपूर्ण विदर्भ 
गुरुवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ 
शुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र 
शनिवार ः संपूर्ण महाराष्ट्र, 
--------------------------- 
मंगळवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३६.१ 
  • अलिबाग ३६.१ 
  • रत्नागिरी ३५.२ 
  • डहाणू ३५.२ 
  • पुणे ३६.१ 
  • जळगाव ४१.२ 
  • कोल्हापूर ३५.१ 
  • महाबळेश्वर २८.८ 
  • मालेगाव ३९.० 
  • नाशिक ३६.९ 
  • सांगली ३६.८ 
  • सातारा ३५.१ 
  • सोलापूर ३९.२ 
  • औरंगाबाद ३७.२ 
  • परभणी ३७.५ 
  • बीड ३९.३ 
  • नांदेड ३९.० 
  • अकोला ४१.१ 
  • अमरावती ३९.४ 
  • बुलडाणा ३७.५ 
  • ब्रम्हपुरी ४०.३ 
  • चंद्रपूर ३९.४ 
  • गोंदिया ३८.८ 
  • नागपूर ३९.५ 
  • वर्धा ४०.५ 

इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...