agriculture news in Marathi rain may increased in state Maharashtra | Agrowon

जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 मे 2021

मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे.

पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे. पुढील पाच ते सहा मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. तर विदर्भ व कोकण काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही भागांत आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढत असल्याने कमी झालेला पारा पुन्हा वाढला आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असले, तरी उन्हाच्या चटक्यामुळे उकाडा वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. ७) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील काही दिवस कमाल तापमान कमीअधिक राहणार आहे. 

उत्तर कर्नाटक व परिसर ते दक्षिण केरळ व किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच गुजरातच्या उत्तर भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर पूर्व पश्‍चिम असलेल्या मध्य प्रदेश ते त्रिपुरा, झारखंड, पश्‍चिम बंगालदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्राचा आग्नेय भाग आणि मालदिव परिसरात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
शनिवार ः
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद व जालना हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र, 
रविवार ः पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र, 
सोमवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र 
मंगळवार ः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, बीड, जालना, औरंगाबाद, वगळता संपूर्ण महाराष्ट्र 

शुक्रवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३४.२ 
 • अलिबाग ३३.३ 
 • रत्नागिरी ३४.४ 
 • डहाणू ३४.२ 
 • पुणे ३८.२ 
 • जळगाव ४१.९ 
 • कोल्हापूर ३५.३ 
 • महाबळेश्‍वर २९.७ 
 • मालेगाव ४०.८ 
 • नाशिक ३७.४ 
 • सांगली ३५.९ 
 • सातारा ३६.६ 
 • सोलापूर ३९.६ 
 • औरंगाबाद ३९.३ 
 • परभणी ४०.१ 
 • नांदेड ४०.५ 
 • अकोला ४३.४ 
 • अमरावती ४१ 
 • बुलडाणा ३९.६ 
 • ब्रह्मपुरी ४१.३ 
 • चंद्रपूर ४१.८ 
 • गोंदिया ४१ 
 • नागपूर ४१ 
 • वाशीम ४०.४ 
 • वर्धा ४२.५ 
 • यवतमाळ ४२.७ 

इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...