मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस

लातूर, जालना, परभणीः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली.
Rain in most places in Marathwada
Rain in most places in Marathwada

लातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालना व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मंडळांत अतिपावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळात दमदार पाऊस झाला. बोरोळ मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पाऊस बरसला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ४९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ व बीड जिल्ह्यातील ५३ मंडळांत पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात २२.३, उस्मानाबादमधील गोविंदपूर मंडळात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४४ मंडळांत पाऊस झाला. जालना शहर, ढोकसाळ व पांगरी मंडळात अतिवृष्टी झाली.

जालना शहर मंडळात ८३.५ मिलिमीटर, पांगरी ८७, तर ढोकसाळ मंडळात ७०.३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला.  लातूर जिल्ह्यातील ६० मंडळात हजेरी लावणारा पाऊस देवणी, बोरोळ व मोघा या तीन मंडळांत अति बरसला. देवनी मंडळात ८२.८ व मोघा मंडळात ७५ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव वडीगोद्री येथे बुधवारी सकाळी व दुपारी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवळी येथेही दमदार पाऊस झाला.

परभणी, हिंगोलीत जोरदार

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६७ मंडळांत बुधवारी (ता.१६) सकाळी संपलेल्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांत हलका पाऊस झाला. परभणी, जिंतूर, मानवत, पालम तालुक्यातील मंडळामध्ये पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com