Agriculture news in marathi Rain in most places in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

लातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली.

लातूर, जालना, परभणी ः उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील अनेक मंडळांत बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालना व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मंडळांत अतिपावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळात दमदार पाऊस झाला. बोरोळ मंडळात सर्वाधिक १५५ मिलिमीटर पाऊस बरसला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ४९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ व बीड जिल्ह्यातील ५३ मंडळांत पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात २२.३, उस्मानाबादमधील गोविंदपूर मंडळात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४४ मंडळांत पाऊस झाला. जालना शहर, ढोकसाळ व पांगरी मंडळात अतिवृष्टी झाली.

जालना शहर मंडळात ८३.५ मिलिमीटर, पांगरी ८७, तर ढोकसाळ मंडळात ७०.३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. 
लातूर जिल्ह्यातील ६० मंडळात हजेरी लावणारा पाऊस देवणी, बोरोळ व मोघा या तीन मंडळांत अति बरसला. देवनी मंडळात ८२.८ व मोघा मंडळात ७५ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव वडीगोद्री येथे बुधवारी सकाळी व दुपारी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवळी येथेही दमदार पाऊस झाला.

परभणी, हिंगोलीत जोरदार

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६७ मंडळांत बुधवारी (ता.१६) सकाळी संपलेल्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांत हलका पाऊस झाला. परभणी, जिंतूर, मानवत, पालम तालुक्यातील मंडळामध्ये पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.
 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...