agriculture news in Marathi rain in Nagar district Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला.

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथे घरावरील पत्र्याचे शेड अंगावर पडल्याने वृद्धेचा तर आडगाव येथे तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. सततच्या पावसाने फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने भाजीपाला नेता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पाथर्डी, नगर, पारनेर, राहुरी, नेवासा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. एकतर कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाजारात भाजीपाला, फळे नेताना अनेक अडचणी येत आहेत.

त्यातच पावसाने हाती आलेला भाजीपाला, फळांसह काढणीला आलेला गहू, कांदा, चारापिकांचे नुकसान होत आहे. तीन दिवसानंतरही अजून नुकसानीचा प्राथमिक अहवाल आलेला नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसात सुमारे दिड हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

शुक्रवारी सायंकाळी पाथर्डी तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने सोनोशी (ता. पाथर्डी) येथे वादळाने उडालेले घरावरील पत्र्याचे शेड अंगावर पडून कलाबाई उत्तम दौंड (वय 80) या वृद्धेचा तर आडगाव येथे खंडू रामा लोंढे (वय 21) या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. 

दरम्यान, पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...