नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४३ मंडळांत बुधवारी (ता. ७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मोघाली (ता. भोकर) मंडळात सर्वाधिक ७५ मिलिमीटर पाऊस झाला. 

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ७७ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. भोकर, नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, मुखेड तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. चुडावा मंडळात सर्वाधिक ४७ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली.

कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. वसमत तालुक्यातील हयातनगर मंडळात सर्वाधिक ३८ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

नांदेड जिल्हा नांदेड ३५, नांदेड ग्रामीण ४२, वजीराबाद ४०, वसरणी ४१, तरोडा ४४, लिंबगाव ४८, तुप्पा ३७,विष्णुपुरी ३१, अर्धापूर १६, मालेगाव ३, दाभड ३६, मुदखेड ५८, मुगट ५१, बारड ३७, हदगाव १३, तामसा ९, मनाठा ८, पिंपरखेड ११, आष्टी १३, निवघा ८, किनवट ५, इस्लापूर १६, बोधडी १४, जलधारा ४०, शिवणी १९, सरसम ८, जवळगाव १८, भोकर ४०, किनी ३२, मोघाली ७५, मातुल ६२, उमरी ४९, सिंदी २६, गोलेगाव ३०, धर्माबाद ४८, जारिकोट ४९, करखेली ४८, नायगाव १३, नरसी ६, मांजरम ७, बरबडा ९, कुंटूर ४०, बिलोली १६, कुंडलवाडी ३२, आदमपूर १०, लोहगाव ८, देगलूर २६, खानापूर ७, शहापूर ३०, मरखेल १७, मालेगाव २४, हानेगाव ५, मुखेड ५,जांब ३५, येवती ३४, जाहूर २३, मुक्रमाबाद ११, बाऱ्हाळी ४२,  फुलवल २, उस्माननगर १२, बारुळ १०, कुरुला ११, लोहा ९, माळाकोळी ६, कलंबर १२, शेवडी १६, सोनखेड १६, कापसी ३२.
परभणी जिल्हा परभणी २०, परभणी ग्रामीण १५, सिंगणापूर २०, दैठणा १५, पेडगाव ११, पिंगळी २६, जांब १३,  झरी १२, बोरी ७, जिंतूर ८, बामणी १५, आडगाव ५, कोल्हा ९, पाथरी ६,  बाभळगाव ६, हदगाव ९, आवलगाव १२, गंगाखेड १५, राणीसावरगाव १५, माखणी २५, महातपुरी ५, पालम १०, पूर्णा ४६, ताडकळस १५, चुडावा ४७, लिमला १९, कात्नेश्‍वर १८.
हिंगोली जिल्हा सिरसम ९, डिग्रस १०, नांदापूर ९, आखाडा बाळापूर ११, डोंगरकडा ११, वारंगा फाटा १०, वाकोडी ८, वसमत ५, हट्टा १५, गिरगाव ८, कुरुंदा ६, आंबा ८, हयातनगर ३८, औंढा नागनाथ ११, येळेगाव ११, सेनगाव १२, आजेगाव ८, हत्ता ९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com