पावसाची लातूर, उस्मानाबादकडे पाठ

पावसाची लातूर, उस्मानाबादकडे पाठ
पावसाची लातूर, उस्मानाबादकडे पाठ

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरविली. औरंगाबाद, जालन्यामध्ये जवळपास सर्वच मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव व गेवराई तालुक्‍यातील केवळ १५ मंडळांत पावसाने तुरळक हजेरी लावली.  

मराठवाड्यावर पावसाची नाराजी कायम आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्व ६५ मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली. औरंगाबाद तालुक्‍यातील १० मंडळांत २ ते १३ मिलिमीटर, फुलंब्री तालुक्‍यातील ४ मंडळांत ४ ते १२ मिलिमीटर, पैठण तालुक्‍यातील १० मंडळांत ६ ते १२ मिलिमीटर पाऊस झाला. सिल्लोड तालुक्‍यातील ८ मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाला.

या आठही मंडळांत १२ ते १८ मिलिमीटर, सोयगाव तालुक्‍यातील ३ मंडळांत ५ ते १७, वैजापूर तालुक्‍यातील १० मंडळांत ४ ते १७, गंगापूर तालुक्‍यातील ९ मंडळांत ५ ते १२, कन्नड तालुक्‍यातील ८ मंडळांत ८ ते १६, तर खुल्ताबाद तालुक्‍यातील तीन मंडळांत ४ ते ११ मिलिमीटर पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांत झालेल्या पावसाची हजेरी तुरळक ते हलकीच राहिली. जालना तालुक्‍यातील ८ मंडळांत ४ ते १३ मिलिमीटर, बदनापूर तालुक्‍यातील ५ मंडळात ६ ते २०,भोकरदन तालुक्‍यातील ८ मंडळांत ५ ते २३, जाफराबाद तालुक्‍यातील ४ मंडळांत ७ ते १७, परतूर तालुक्‍यातील ५ मंडळांत ६ ते १७, मंठा तालुक्‍यातील ४ मंडळांत ४ ते १३, अंबड तालुक्‍यातील ७ मंडळांत ९ ते १३, घनसावंगी तालुक्‍यातील ७ मंडळांत ७ ते १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड, वडवणी तालुक्‍यातील १५ मंडळांत १ ते ६ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यांतर्गत अंबूलगा मंडळांत ३ मिलिमीटर पाऊस झाला. इतर एकाही मंडळात पाऊस झाला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात तर एकाही मंडळात पावसाची नोंद झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com