तीन जिल्ह्यांतील १४८ मंडळांत हलक्या ते जोरदार पावसाची हजेरी

सिरपूर येथील गळाटी नदीला अतिवृष्टीमुळे शनिवारी पूर आला
सिरपूर येथील गळाटी नदीला अतिवृष्टीमुळे शनिवारी पूर आला

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४९ पैकी १४८ मंडळांमध्ये शनिवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सेलू मंडळात सर्वाधिक ९८ मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसात खरीप आणि भाजीपाला पिके झोडपली गेली. ओढे, नाले, नद्यांना पूर आले. पुराचे पाणी पिकांत शिरल्याने मोठे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने यंदा ऐन दिवाळीत आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ७९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड माहूर, हिमायतनगर, भोकर, मुखेड, लोहा तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. लोहा तालुक्यातील माळाकोळी मंडळात सर्वाधिक ६४ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. 

सेलू, पालम, पूर्णा तालुक्यांतील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सेलू तालुक्यात सर्वाधिक ९८ मिलिमीटर पाऊस झाला. रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे पालम तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.

मंडळनिहाय पाऊस (मिमी)ः नांदेड शहर ४३, नांदेड ग्रामीण ३२, विष्णुपुरी ४७, वसरणी ४२, वजीराबाद ३९, तरोडा ३१, लिंबगाव ४९, अर्धापूर २९, दाभड २२, मालेगाव २९, मुगट १२,बारड ३५, मनाठा १७, निवघा १२, तळणी २१,माहूर २६, वानोळा ४८, वाई १४, इस्लापूर २२, मांडवी १३, दहेली ११, शिवणी ११, हिमायतनगर ५६, सरसम ३४, जवळगाव १४, भोकर २२, किनी १३, मातुल ६०, उमरी २४, सिंधी २६, गोळेगाव ३०, धर्माबाद २८, जारिकोट २५, करखेली १८, मांजरम १९, बरबडा १२, कुंटूर १४, बिलोली १६, आदमपूर १०, लोहगाव १४, सगरोळी १२, कुंडलवाडी १८, शहापूर १६, मरखेल १७, मालेगाव १२, हानेगाव १७, मुखेड ११, जांब ६०, येवती १६, जाहूर १५, मुक्रामबाद १६, कंधार ३८, कुरुला ४७, उस्माननगर २७, बारुळ ११, पेठवडज १७, फुलवळ ३५, लोहा २२, माळाकोळी ६४, कलंबर ३९, शेवडी ५५, सोनखेड ४६.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ४८, परभणी ग्रामीण ४३, सिंगणापूर २०, दैठणा २०, झरी ५०, पेडगाव २२.८०, पिंगळी ५३, जांब २७, जिंतूर ९, सावंगी म्हाळसा २०, बोरी २१, चारठाणा १३, आडगाव ३०, बामणी १६, सेलू ९८, देऊळगाव ३८, कुपटा ३२, वालूर ३५, चिकलठाणा ३५, मानवत २०, केकरजवळा ११, कोल्हा ५५, पाथरी १९, बाभळगाव २५, हदगाव ३७, सोनपेठ ४०, आवलगाव २२, गंगाखेड ४०, राणीसावरगाव ५०, माखणी ४७, महातपुरी ४०, पालम ७२, चाटोरी ८९, बनवस ४०, पूर्णा ६५, ताडकळस ६९, चुडावा ७२, लिमला ६९, कात्नेश्वर ४३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १७, खंबाळा १४, माळहिवरा २३, सिरसम २७, कळमनुरी ३१, नांदापूर १३, आखाडा बाळापूर ११,डोंगरकडा २३, वारंगाफाटा २०, वाकोडी १४, आजेगाव १५,वसमत १७,हट्टा ४५, गिरगाव ३२, कुरुंदा २२, टेंभुर्णी २४, आंबा २४, हयातनगर १५, औंढा नागनाथ १९, जवळा बाजार १७, येळेगाव २४, साळणा १३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com