परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले कोंब

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. पाऊस थांबत नसल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. शेतातील उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. कपाशीची बोंडे सडत आहेत. तूरीमध्ये मर लागली आहे.
परभणी, हिंगोली जिल्ह्यात अतिपाऊस , पीकांची नासाडी
परभणी, हिंगोली जिल्ह्यात अतिपाऊस , पीकांची नासाडी

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. शुक्रवारी (ता.२४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ८२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव मंडलात अतिवृष्टी झाली. पाऊस थांबत नसल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. शेतातील उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. कपाशीची बोंडे सडत आहेत. तूरीमध्ये मर लागली आहे.

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडळांमध्ये सरासरी २५.४ मिमी पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील अनेक मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत सरासरी ११ मिमी पाऊस झाला. वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस ः

परभणी जिल्हा ः २७.५, जांब ३१.३, झरी २९.८, सिंगणापूर २९, दैठणा ३७.५,टाकळी कुंभकर्ण २३.३, जिंतूर १५, बामणी १७, बोरी २३.३, आडगाव २५.३,दूधगाव ३०.३, सेलू १९.८, देऊळगाव गात ५८.८, वालूर १८.३. हिंगोली जिल्हा ः आंबा २०, कुरुंदा ४४,औंढा नागनाथ ३६.३, साळणा ३८.५,जवळा बाजार ४५, गोरेगाव २४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com