परभणी तालुक्यात पावसाने केळीसह पिकांचे नुकसान

परभणी ः परभणी तालुक्यात शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे केळी तसेच अन्य फळपिकांचे नुकसान झाले.
Rain in Parbhani taluka Damage to crops including bananas

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत ४८.८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील परभणी, पिंगळी, लोहगाव, सिंगणापूर या मंडळासह अन्य भागात शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे केळी पीक मोडून पडले.

आंबा तसेच अन्य फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. वाळवत घातलेली हळद भिजून नुकसान झाले. नुकसानीची भरपाई देण्याची मागणी  शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com