कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत रिमझिम

कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत रिमझिम
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत रिमझिम

कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या ऊन-पावसाच्या खेळानंतर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी धुके, तर बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते. हवामानबदलाचा फटका प्रामुख्याने भाजीपाला पिकाला बसत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून, जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे भातकापणीत अडथळा निर्माण झाला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन व सायंकाळी जोरदार पाऊस, असे चित्र राहिले. याचा परिणाम खरीप पिकांच्या काढणीवर झाला होता. विशेष करून पश्‍चिमेकडून भातपीक कापणीला आले आहे. भाताची झोडपणी करून त्याच्या मळणीची कामे वेगात होती. परंतु, सायंकाळी ठरवून आल्यासारख्या पावसाने सगळ्यांचे नियोजनच बिघडवून टाकले. अनेक ठिकाणी दिवसभर कडक ऊन असल्याने शेतकऱ्यांनी सायंकाळी पावसाची शक्‍यता गृहीत धरून दुपारीच मळणीला प्राधान्य दिले होते. आता ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कोड्यात टाकले आहे.

दिवसभर ढगाळ हवामान असल्याने पाऊस येईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी पीककापणीचे नियोजन पुढे ढकलले आहे. दिवसभर ढगाळ हवामान राहत असल्याने याचा फटका खरीप पिकाच्या काढणीला बसला आहे. पण, भाजीपाल्याच्या व्यवस्थापनेलाही बसत आहे. ढगाळ व उष्ण हवेमुळे भाजीपाल्यात कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्‍यता आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी ढगाळ हवामानामुळे त्रस्त बनला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता. १७) सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर रात्री काही भागांत तुरळक पाऊसदेखील झाला. शुक्रवारी (ता. १८) पहाटेपासून ढगाळच वातावरण आहे. काही भागांत रिमझिम पाऊसदेखील झाला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी केलेला भात भिजला. काही शेतकऱ्यांनी लगबगीने भातांची बांधणी करून ठेवली आहे.

पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी भातकापणीत गुंतला होता. मात्र, पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भातशेतीवर अगोदरच कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com