agriculture news in marathi, rain perdiction only in konkan region | Agrowon

ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी; कोकणात तुरळक ठिकाणी हजेरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण आणि घटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहेत. उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात एखाद्‌ दुसऱ्या सरीचा अपवाद वगळता पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. आज (ता. १५) कोकण वगळता उर्वरित राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण आणि घटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहेत. उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात एखाद्‌ दुसऱ्या सरीचा अपवाद वगळता पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. आज (ता. १५) कोकण वगळता उर्वरित राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

काेकण, घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांचा पूर आटला आहे. धरणांमधील पाण्याचा येवाही कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही पाऊस थांबला असून, मराठवाडा, विदर्भात पावसाची ओढ कायम आहे. गुरुवारपर्यंत (ता. १८) पावसाची उघडीप कायम राहणार आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने शुक्रवारपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : माथेरान ७०, पनवेल, राजापूर, संगमेश्‍वर, सावंतवाडी प्रत्येकी ६०, लांजा, शहापूर, वसई, मुरबाड प्रत्येकी ५०, अंबरनाथ, कणकवली, उल्हासनगर, पालघर, ठाणे, वाडा प्रत्येकी ४०, चिपळूण, कुडाळ, कर्जत, विक्रमगड, पेण, देवगड, वैभववाडी, भिरा, खेड प्रत्येकी ३०. 
मध्य महाराष्ट्र : गगणबाडा ६०, इगतपुरी ५०, शाहूवाडी, त्रिंबकेश्‍वर, लोणावळा, हर्सूल, पारोळा, पन्हाळा, राधानगरी प्रत्येकी २०.
घाटमाथा : ताम्हिणी ६०, कोयना पोफळी, शिरगाव प्रत्येकी ५०, डुंगरवाडी, दावडी, आंबोणे प्रत्येकी ४०, भिवापुरी, ठाकूरवाडी, वाणगाव, खोपोली प्रत्येकी ३०.


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...