राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

 राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात ढगाळ हवामान असले तरी पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता. २८) राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आज (ता. २५) राज्यात तुरळक ठिकाणी हलका, तर कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता. २९) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. मात्र, तोपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान होते. पावसाच्या काही सरी वगळता मुख्यत: कोरडे हवामान होते. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी पडल्या. विदर्भात तुरळक पाऊस पडला. मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) : कोकण : नेरळ ३५, कळकावणे ३२, शिरगांव ४०, अंबवली ३५, तुलसानी ५७, तेरहे ३५, अंबोली ४८, फोंडा ३२, कसाळ ३३, मानगाव ३०, मोखडा ३१. मध्य महाराष्ट्र : नाणशी ३७, वेळुंजे ३०, बोराडी ३९, मोलगी ३७, घोडसगाव ३९, शेंडी ६३, माले ३२, मुठे ३५, भोलावडे ३२, काले ३७, हेळवाक ३७, महाबळेश्‍वर ३९, तापोळा ८५, लामज १२८, बाजार ३४, आंबा ६६, राधानगरी ५९, सरवडे ३१, कडेगाव ३८, कराडवाडी ३२, गवसे ४०, चंदगड ४६, हेरे ३६. विदर्भ : जळगाव ३१, आसलगाव ३१, पिंपळगाव ४०, चिखलदरा ४७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com