तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे ः  पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. येत्या आठवडाभर कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  राज्यात जूनमध्ये दहा ते वीस या दरम्यान पावसाचा खंड पडला होता. त्यानंतर पावसास चांगली सुरवात झाली होती. जुलैपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. यंदाही २२ आॅगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. गेल्यावर्षीही जुलै आॅगस्टमध्ये पावसाने सुमारे ५० ते ५५ दिवस विश्रांती घेतली होती. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पाठ फिरवल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसावरच अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या साप्तहिक अहवालानुसार पंधरा आॅगस्टपर्यंत देशाच्या उत्तर भागात माॅन्सून अधिक सक्रिय राहणार आहे. उत्तर भागात माॅन्सून सरकल्याने या भागात कमी दाबाचे अधिक क्षेत्र तयार होईल. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य भारतात माॅन्सून सक्रिय होण्यासाठी फारशी अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने दडी मारली आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः (मिलिमीटरमध्ये) कोकण ः लांजा ५०, माथेरान ४०, भिरा, जव्हार, कुडाळ, मंडणगड, म्हसळा ३०, दोडा मार्ग, मोखेडा, राजापूर, रत्नागिरी, शहापूर २०  मध्य महाराष्ट्र ः राधानगरी ६०, गगनबावडा, महाबळेश्वर ५०, लोणावळा ४०, इगतपुरी ३०, चंदगड, पाटण २०  मराठवाडा ः चाकूर ३०, देवणी, रेणापूर, उदगीर १०, विदर्भ ः चिमूर ३०, धारणी २०, आर्वी, चिखलदरा, गोंदिया, हिंगणघाट, कुही, सालेकसा, शिंदेवाही, वर्धा १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com