agriculture news in Marathi, rain possibilities in Kokan and hill area, Maharashtra | Agrowon

कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी दाबक्षेत्राचा प्रभाव कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, विदर्भाचा पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अधूनमधून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली. 

पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी दाबक्षेत्राचा प्रभाव कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, विदर्भाचा पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अधूनमधून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली. 

अरबी समुद्र आणि कर्नाटकाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. तसेच कर्नाटक व ते करेळ या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढेल. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. 

गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यात हलक्या सरी पडत आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकणातील मंडणगड १५० मिलिमीटर, चिपळून १३०, खेड ११० मिलिमीटर पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ११० मिलिमीटर, महाबळेश्वर ९०, राधानगरी, आजरा ६० मिलिमीटर पाऊस पाऊस पडला. तर अंबोणे, शिरगाव, कोयना (नवजा), दावडी, शिरोटा, वळवण या घाटमाथ्यावरही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आल्याने धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

मॉन्सूनची हरियाना, पंजाबमध्ये प्रगती 
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाच्या बहुतांशी भाग व्यापला आहे. सोमवारी (ता. १५) मॉन्सूनने अधिक प्रगती करत हरियाना आणि पंजाबचा काही भाग व्यापला आहे. तर राजस्थान व पंजाबसह संपूर्ण देश व्यापण्यास आणखी काही काळ लागणार आहे. दरम्यान देशाच्या अनेक भागांत मॉन्सून सक्रिय झाला आहे. यामुळे चेरापुंजी, करवीर, होनावर, शिराली, मिनिकॉय, पटियाळा, महाबळेश्वर, मजबत आणि इगतपुरी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर आसाम, मेघालय, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.

गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत - हवामान विभाग)
कोकण ः मंडणगड १५०, चिपळून १३०, खेड ११०, दोडामार्ग, म्हसळा ९०, कनकवली, कुडाळ ८०, सावंतवाडी, श्रीवर्धन, रोहा ६०, राजापूर ५०, महाड, वाडा, मानगाव, वैभववाडी ४०, तला, सुधागड, लांजा, हर्णे, पेण, खालापूर ३०, पोलादपूर, माथेरान, गुहागर, वेंगुर्ला, मुरूड, मालवण २०, शहापूर, संगमेश्वर देवरूख, पालघर, देवगड, ठाणे, जव्हार १०.
मध्य महाराष्ट्र ः गगनबावडा ११०, महाबळेश्वर ९०, राधानगरी, आजरा ६०, चांदगड, पौंड, लोणावळा ४०, शाहूवाडी, इगतपुरी, पाटण, गारोगोटी ३०, जावळीमेढा, पुन्हाळा, वेल्हे २०, तासगाव, हातकणंगले, कराड, भोर, कागल, त्र्यंबकेश्वर १०,
विदर्भ ः सावली ३०, लाखणी, साकोली २०, कोपर्णा, अरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, कोरर्ची, कुरखेडा, बल्लारपूर, मूल, भद्रावती, शिंदेवाही, नागभीर १०,
घाटमाथा ः अंबोणे १००, शिरगाव, कोयना (नवजा) ६०, दावडी ५०, शिरोटा, वळवण ३०, ठाकूरवाडी, वानगाव, भिवपुरी, डुंगरवाडी, खोपोली, खांड, ताम्हीनी २०, कोयना (पोफळी) १२०, धारावी ९०, भिवापुरी ७०.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...