कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.   जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर शुक्रवारपासून (ता. १९) राज्यात पावसाला सुरवात झाली. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पावसाने ओढ दिलेल्या भागात मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार असले तरी पाणीटंचाई कमी होण्यास जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर, मालवण, सटाणा, बागलाण येथे १०० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण, फलटण, खटाव तालुक्यांत शुक्रवारी (ता. १९) सायकांळी दमदार पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूरसह, जुन्नर तालुक्यांच्या कोरडवाहू पट्ट्यात दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली.बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा, मलकापूर, वाशीम जिल्ह्यांत कारंजा व अकोल्यात प्रामुख्याने मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा व इतर तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी दिली. नगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी साधारण पंचवीस महसूल मंडळात पाऊस झाला. शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : वेंगुर्ला ११०, मालवण १००, देवगड ९०, भिवंडी, दापोली, दोडामार्ग, हर्णे प्रत्येकी ४०, भिरा, गुहागर, मंडणगड, कुलाबा प्रत्येकी ३०, अंबरनाथ, मुलदे, श्रीवर्धन, वैभववाडी प्रत्येकी २०.  मध्य महाराष्ट्र : सटाना, बागलाण प्रत्येकी १००, बारामती, माळशिरस प्रत्येकी ७०, सिन्नर ६०, देवळा, जेऊर, फलटण प्रत्येकी ५०, चंदगड, चांदवड, दौंड, नंदुरबार, निफाड, संगमनेर, शिरपूर प्रत्येकी ४०, जामखेड, मालेगाव, पुणे प्रत्येकी ३०, आजरा, अकोले, गिरणा धरण, हर्सुल, इगतपुरी, कळवण, माढा, सांगोला, शहादा, त्र्यंबकेश्वर, वाई, यवत प्रत्येकी २०, नगर, अक्कलकुवा, आटपाडी, भोर, चाळीसगाव, दहिवडी, दिंडोरी, गगनबावडा, इंदापूर, जत, जावळीमेढा, कागल, खटाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, मंगळवेढा, नवापुर, पौड मुळशी, साक्री, सातारा, सोलापूर, सुरगाणा, तळोदा प्रत्येकी १०.मराठवाडा: बिलोली ९०, उदगीर ७०, तुळजापूर ६०, धर्माबाद, उमरी प्रत्येकी ५०, भूम, देवणी प्रत्येकी ४०, अंबड, कंधार, नायगाव खैरगाव, नांदेड प्रत्येकी ३०, अहमदपुर, औसा, देगुलूर, कळंब, लोहा, लोहारा, मुखेड, फुलांब्री, शिरूर अनंतपाळ, सोनपेठ प्रत्येकी २०, औंढा नागनाथ, बदलापूर, घनसावंगी, जळकोट, मुदखेड, परतूर, पूर्णा, रेणापूर, वसमत प्रत्येकी १०. विदर्भ : देवरी ४०, आष्टी ३०, अमरावती, भिवापूर, हिंगणा, कोर्ची, लाखनी, मुर्तिजापूर, नागपूर, नांदूरा, सिरोंचा, उमरेड प्रत्येकी २०, अर्जुनीमोरगाव, बाळापूर, बार्शी टाकळी, बुलढाणा, चिमुर, धानोरा, एटापल्ली, कळमेश्वर, काटोल, खारंघा, कुरखेडा, मलकापूर, मोर्शी, पातूर, पवनी, सडक अर्जुनी, सालेकसा, वर्धा, वरुड प्रत्येकी १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com