agriculture news in Marathi, rain possibilities in Sangali, Kolhapur, Osmanabad and Beed | Agrowon

सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीडमध्ये आज पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसह काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. आज (ता. ७) कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता अाहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसह काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. आज (ता. ७) कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता अाहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

काेल्हापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) सायंकाळी हलक्या ते जाेरदार पावसाने हजेरी लावली. कागल, गडहिंग्लज, भूदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत पावसाच्या सरी पडल्या. गडहिंग्लज येथे पावसाचा जोर अधिक असल्याने ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, थंडी गायब झाली आहे. 

गुरुवारी (ता. ६) नागपूर येथे नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर कोकण आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अाहे. यामुळे गुरुवारी दुपारनंतर राज्यात अंशत: ढगाळ हवामान झाले होते. तर अग्नेय बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाच पट्टा सक्रीय असून, रविवारपर्यंत (ता. ९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने दक्षिण भारतात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
गुरुवारी (ता. ६) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.१, नगर १३.६ (१), जळगाव १४.०(१), कोल्हापूर २०.३(४), महाबळेश्‍वर १६.५(३), मालेगाव १५.६ (३), नाशिक १२.६(१), सांगली १७.९(२), सातारा १६.८ (२), सोलापूर १९.३(३), सांताक्रुझ १९.८(२), अलिबाग २१.२(२), रत्नागिरी २१.८(१), डहाणू १९.४(०), आैरंगाबाद १३.४(१), परभणी १६.६ (२), नांदेड १९.५ (५), उस्मानाबाद १७.२, अकोला १६.०(२), अमरावती १५.०(-१), बुलडाणा १७.२ (२), चंद्रपूर १८.४(४), गोंदिया १४.०(०), नागपूर १३.१(०), वर्धा १६.१(२), यवतमाळ १६.१ (२).

इतर अॅग्रो विशेष
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...
कृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशादेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी...
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात...
जैवविविधतेचा ऱ्हास करणारा प्रकल्प नकोचनियोजित नवमहाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचं क्षेत्र...
पाण्याचा ताळेबंद गरजेचाच नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या...