agriculture news in Marathi, rain possibilities in several places in state, Maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्याच्या परिसरात असलेले बाष्प कमी झाले आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे असले तरी मध्य महाराष्ट्र, कोकणात अंशतः ढगाळ हवामान आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हीच स्थिती राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्याच्या परिसरात असलेले बाष्प कमी झाले आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे असले तरी मध्य महाराष्ट्र, कोकणात अंशतः ढगाळ हवामान आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हीच स्थिती राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वायू चक्रीवादळाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र व कोकणातील वातावरणावर झाला असून, अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा तयार झाला होता. परिणामी काही दिवसांपासून वाढलेला कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला होता. मात्र, विदर्भ व मराठवाड्यात हवामान कोरडे असल्याने उन्हाचा चटका अजूनही कायम होता. गुरुवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअसची राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.  

 केरळ ते कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच, मध्य प्रदेशातही समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या मॉन्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यात मॉन्सूनला दाखल होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी असून, त्यापूर्वी राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील तापमानात झपाट्याने बदल होत असून कोल्हापूर, पुणे, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, अलिबाग या शहरांचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने खाली आला आहे. खानदेश, मराठवाडा, विदर्भात अजूनही उन्हाच्या झळा कायम असून, सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत आहे. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड या प्रमुख शहरांचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे.  

वायू चक्रीवादळामुळे कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला; तर सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. रायगडमधील ताला मंडळात सर्वाधिक ८६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर वळवटी, बोर्लीपचटन, श्रीवर्धन, मेंढा, निझामपूर, मुरूड, रोहा, नागोठणे, चनेरा येथे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे खरिपाच्या तयारीला वेग आला असून, शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्यास सुरवात केली आहे. 

गुरुवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३१.२ (-१.०), जळगाव ४२.८ (३.८), कोल्हापूर २७.८ (-२.७), महाबळेश्‍वर १९.८ (-३.५), मालेगाव ४०.२ (३.८), नाशिक ३४.३ (०.३), सांगली २९.८ (-२.१), सातारा २७.७ (-३.२), सोलापूर ३४.५ (-१.०), मुंबई (सांताक्रूझ) ३३.५ (०.९), मुंबई ३१.७ (-०.८), अलिबाग ३१.४ (-०.६), रत्नागिरी ३१.८ (१.१), डहाणू ३५.७ (२.३), औरंगाबाद ३७.० (१.७), बीड ३८.४ (२.५), नांदेड ४२.० (४.४), परभणी ४०.५ (३.२), उस्मानाबाद ३७.० (१.७), अकोला ४२.४ (४.०), अमरावती ४३.४ (५.०), बुलडाणा ४०.४ (५.४), ब्रह्मपुरी ४४.६ (५.९), चंद्रपूर ४६.० (६.९), गोंदिया ४३.५ (४.०), नागपूर ४३.७ (४.६), वाशीम ४०.०, वर्धा ४३.८ (५.६), यवतमाळ ४२.० (३.९).

सर्वाधिक पाऊस झालेली मंडळे, पाऊस मिलिमीटरमध्ये 
ताला ८६, वळवटी ७४, बोर्लीपचटन ७३, श्रीवर्धन, मेंढा ७०, निझामपूर, मुरूड ६९, रोहा ६३, नागोठाणे ६२, चनेरा ६०, बलकुम ११, कल्याण ११, उल्हासनगर १३, कुम्भार्ली १७.४, किहीम १५, वावोशी ११, खोपोली २०, पाली ३०, आतोने ३५, जांभूळपाडा ३१, पेण ११, कसू २०, कामर्ली १८, महाड १२, बिरवडी १६, खारवली १७, तुडील १५, मानगाव १६, इंदापूर २२, गोरेगाव २४, लोनेरे १७, कोलाड ५५, पोलादपूर १७, वाकन १५, नांदगाव ५१, बोर्ली २७, म्हसळा ५०, खामगाव ४६, चिपळूण १८, खेर्दी २१, मार्गताम्हाने २२, रामपूर १२, सावर्डे ३२, आसुर्डे २४, कळकवणे २२, शिरगाव २०, दापोली ५१, अंजर्ला २०, वाकवली २०, पालगड २२, भरने २६, दाभीळ १५, दामनंद १७, गुहागर ३९, अंबलोळी ३७, हेडवी २८, मंडणगड ५८, माप्रळ ४३, रत्नागिरी ४७, खेडशी ४५, पानसोप ४१, जयगड २५, तरवाल ३७, कढवाई २४,  
 


इतर अॅग्रो विशेष
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...
बेकायदा विदेशी खत आयातीचे परवाने रद्दपुणे : विद्राव्य खतांची बेकायदा आयात व विक्री...
‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे...नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर...
यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...