नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
अॅग्रो विशेष
राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज
पुणे : विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारपासून (ता. ५) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज र्वतविण्यात आला आहे. तर शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे : विदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारपासून (ता. ५) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज र्वतविण्यात आला आहे. तर शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
उत्तर छत्तीसगड आणि झारखंड परिसरावर समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, केरळपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यास पाेषक हवामान हाेत आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. १०) गुजरात आणि राजस्थान वगळता उर्वरित देशात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशात धुळीची वादळे येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून, ४२ अंशांपर्यंत गेलेले तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा खाली उतरले आहे. राज्याच्या इतर भागात मात्र उन्हाचा ताप कायम आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.
मंगळवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, नगर ४०.५, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.२, नाशिक ३९.२, सांगली ३८.२, सातारा ३७.७, सोलापूर ४०.६, मुंबई ३१.८, अलिबाग ३०.५, रत्नागिरी ३२.५, डहाणू ३१.६, आैरंगाबाद ३९.४, परभणी ४१.४, नांदेड ४०.५, अकोला ४१.६, अमरावती ३९.२, बुलडाणा ३८.५, चंद्रपूर ३९.८, गोंदिया ३७.४, नागपूर ३९.८, वर्धा ४०.०, यवतमाळ ३९.५.