राज्यात आज वादळी पावसाची शक्यता

राज्यात आज वादळी पावसाची शक्यता
राज्यात आज वादळी पावसाची शक्यता

पुणे: पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात आज (ता. १) वादळी पावसाची शक्यता आहे. यात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील लातूर, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. यातच राज्यात गेले काही दिवस सातत्याने उन्हाचा तापही कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाट असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  उन्हाच्या चटक्याने तापलेल्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. सकाळपासूनच असलेल्या उन्हाच्या चटक्यापाठोपाठ दुपारनंतर ढग जमा होत आहेत. गुरुवारी (ता. ३०) रावेर तालुक्यातील (जि. जळगाव) खिरोदा, चिनावल, वाघोता भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले. शुक्रवारी (ता. ३१) दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान झाले होते.  उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढेच आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात बहुतांशी पारा ४४ अंशांच्या पुढे गेला आहे. ब्रह्मपुरी येथे तापमान ४६.५ अंश, तर मराठवाड्यात परभणी येथे सर्वाधिक ४५.६ अंश, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.        शुक्रवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.५ (२.६), जळगाव ४४.४ (२.२), कोल्हापूर ३६.१(१.३), महाबळेश्वर ३२.५ (४.०), मालेगाव ४३.२ (३.९), नाशिक ३७.९ (०.९), सांगली ३८.२ (२.०), सातारा ४०.२ (५.२), सोलापूर ४३.९(४.४), अलिबाग ३३.८ (०.५), डहाणू ३५.० (०.७), सांताक्रूझ ३४.३ (०.८), रत्नागिरी ३४.४ (१.६), औरंगाबाद ४२.३ (३.५), बीड ४४.२ (४.६), परभणी ४५.६ (४.२), नांदेड ४४.० (२.७), अकोला ४५.८ (४.०), अमरावती ४५.८ (३.८), बुलडाणा ४२.५ (४.८), बह्मपुरी ४६.५ (३.७), चंद्रपूर ४६.८ (३.५), गोंदिया ४४.० (१.२), नागपूर ४४.३ (१.५), वाशीम ४३.६, वर्धा ४५.५ (२.९), यवतमाळ ४४.२(२.७). 

मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान बेटांचा परिसर व्यापला. अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागातही मॉन्सून दाखल झाला आहे. सोमवारपर्यंत (ता. ३) बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सूनची प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com