agriculture news in Marathi, rain possibilities in state, pune, maharashtra | Agrowon

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २२) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २२) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आठवडाभर ओढ दिल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मालेगाव, दिंडोरी, निफाड, येवला तालुक्यात विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडला. खरिपाच्या पेरण्यांना जीवनदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. दोध्याड नदीजवळील मंगला यशवंत निकम व प्रशांत यशवंत निकम यांच्या शेतात पाणी घुसल्याने पेरलेली बाजरी, चाऱ्यासह दीड वर्षाच्या डाळिंब पिकासह अख्खे शेतच वाहून गेले.

पूर्व भागात झालेल्या पावसामुळे विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला, कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे. येवला तालुक्याच्या पूर्व भागात ओढे, नाले भरून वाहत होते. गेल्या चार वर्षात कधीही न भरलेले बंधारे या पावसामुळे भरून वाहिले. कोळगाव येथील गावानजीक असलेला बंधारा फुटला. तर गावातील कोळगंगा नदी चार वर्षांनंतर भरून वाहिली.

नगर जिल्ह्यामधील अनेक मंडळांत पावसाने हजेरी लावली असून, खरिपाच्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाला सुरवात झाली असली तरी पूर्वीसारखा जोर नाही. त्यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात फारसी वाढ होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस पडला. बारामती तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. दुष्काळी भागातील ओढे खळाळून वाहिले. या भागातील जलसंधारणाच्या कामांमध्ये भरपूर पाणी जमा झाले. दुष्काळाने होरपळणाऱ्या औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यातही पावसाने जोर धरला होता. लातूर, बीड,उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : खेड ११०, उल्हासनगर ९०, म्हसळा, शहापूर प्रत्येकी ६०, मंडणगड ५०, भिरा, पालघर, सांगे प्रत्येकी ४०, अंबरनाथ, मालवण, माथेरान, मुरुड, पोलादपूर प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र : नगर, जामनेर प्रत्येकी १२०, चाळीसगाव ९०, नेवासा ८०, अमळनेर, दहिगाव, धुळे, नवापूर, पाचोरा, येवला प्रत्येकी ७०, चांदवड, दिंडोरी, नंदुरबार, पारोळा, साक्री प्रत्येकी ६०, अक्कलकुवा, भडगाव, मालेगाव, नांदगाव, शिरपूर, श्रीगोंदा, सिंधखेड प्रत्येकी ५०, बारामती, देवळा, एरंडोल, कळवण, करमाळा, निफाड, श्रीरामपूर, तळोदा प्रत्येकी ४०, आंबेगाव घोडेगाव भोर, भुसावळ, बोदवड, चोपडा, इगतपुरी, जळगाव, कवठे महांकाळ, संगमनेर, सटाला, बागलाण, शहादा, शिरूर, सुरगाना, तासगाव प्रत्येकी ३०.
मराठवाडा : कन्नड १२०, कळमनुरी ७०, सोयेगाव ६०, माहूर ५०, औंढा नागनाथ, उमरी प्रत्येकी ४०, औरंगाबाद, जाफराबाद, खुलताबाद, मुदखेड, मुखेड, नायगाव खैरगाव, फुलंब्री, सेनगाव, वैजापूर प्रत्येकी ३०, अर्धापूर, बिलोली, हिंगोली, जालना, कंधार, नांदेड, पूर्णा, वसमत प्रत्येकी २०.
विदर्भ : अमरावती, बुलडाणा, चांदूर, चिखली प्रत्येकी ५०, आर्वी, जिवती, तेल्हारा प्रत्येकी ४०, अकोला, बाळापूर, चिखलदरा, खारांघा, मोताळा, रिसोड, संग्रामपूर, यवतमाळ प्रत्येकी ३०, अकोट, अंजनगाव, अरणी, आष्टी, बाभूळगाव, बार्शीटाकळी, बटकुली, दारव्हा, दारापूर, देऊळगाव राजा, देसाईगंज, हिंगणघाट, खामगाव, मालेगाव, मलकापूर, मंगरूळपीर, मानोरा, मुर्तिजापूर, पातुर, सेलू, सिंधखेड राजा, उमरेड, वाशीम प्रत्येकी २०.
घाटमाथा : कोयना (पोफळी) ७०, डुंगरवाडी, ठाकूरवाडी प्रत्येकी ४०, ताम्हिणी, वाणगाव, खंद, शिरगाव प्रत्येक ३०.


इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...