agriculture news in Marathi, rain possibilities in Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 एप्रिल 2019

पुणे  : राज्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमी वादळी पावसाने हजरी लावल्याने तापमानात घट होत आहे. आज (ता. १७) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

पुणे  : राज्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमी वादळी पावसाने हजरी लावल्याने तापमानात घट होत आहे. आज (ता. १७) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

मंगळवारी (ता. १६) सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होते. दुपारी परभणी शहर परिसरात ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट होत होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुगाव येथे गारपीट झाली. तर चिंचोली भुयार येथेही पाऊस पडला. लोहारा तालुक्यातील जेवळी, नळदुर्ग भागात पावसाने हजेरी लावली.

औरंगाबादमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडला. तर भोकरदन शहरासह तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण, अधून-मधून पावसाचा शिडकावा झाला. केदारखेडा, जवखेडा परिसरात अधूनमधून विजेच्या कडकडाटसह पावसाचा शिडकावा केला. 

सोमवारी (ता. १५) नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसात फळबागा, हळद आदी पिकांचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील अंधापुरी (ता. पाथरी) शिवारात वीज कोसळून २ शेतकऱ्यांसह ४० शेळ्या ठार झाल्या. वादळी वाऱ्यामुळे आंबा, लिंबू फळे झाडावरून गळून पडली. उशीरा पेरणी केलेली ज्वारी आडवी झाली. बुलडाणा जिल्ह्यातील बिबी परिसरात अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने झाड कोसळून विजेच्या तारा तुटल्या.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, शिरूर तालुक्यांत वादळी वारे, मेघगर्जना, विजा आणि गारांचा पाऊस पडला. पुरंदर, आंबेगाव, शिरूर तालक्यांत झालेल्या आंबा, कलिंगड, टोमॅटो, कांदा, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाला, कापरी, बिजली या फुले पिकांचे गारपीट व पावसाने नुकसान झाले. पुणे शहर आणि परिसरातही साडेचारच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील पाचगणी व भिलार परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाट, विजेसह गारांचा जोरदार पाऊस पडला.

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह निफाड व सिन्नर तालुक्यांत सोमवारी (ता. १५) सायंकाळी गारांचा पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे कांदा, चारा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. गारांचा तडाखा बसून टरबूज, आंब्यासह अंतिम टप्प्यातील द्राक्ष बागा आणि काढणीस आलेल्या गहू पिकाचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी अनेक भागात पाऊस झाला. संगमनेर येथे झालेल्या पावसासोबत वादळ आणि गाराही पडल्या. पावसामुळे जनावरांच्या छावण्यातही दाणादाण झाली. 

राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी ४४ अंशांच्या पार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे. चंद्रपूरसह, ब्रह्मपुरी, आणि नांदेडमध्ये तापमान ४३ अंशांच्या पुढे असून, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात उर्वरित जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ३८ ते ४१ अंशांच्या आसपास होते. ढगाळ हवामान आणि पावसामुळे तापमानात चढ-उतार होत २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.  

मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.० (१.४), धुळे ४०.०, जळगाव ३९.४ (-१.९), कोल्हापूर ३८.३ (१.२), महाबळेश्वर ३३.२ (१.५), मालेगाव ४०.० (०.१), नाशिक ३८.० (०.३), सांगली ३९.५ (१.२), सातारा ३८.६ (१.९), सोलापूर ४२.१(२.१), डहाणू ३३.५ (१.०), सांताक्रूझ ३३.५ (०.९), रत्नागिरी ३५.० (३.०), औरंगाबाद ३८.३ (-०.२), बीड ४१.७ (२.४), नांदेड ४३.० (२.०), उस्मानाबाद ४१.१ (२.८), परभणी ४३.८ (३.३), अकोला ३९.७ (-१.०), अमरावती ४१.२ (०.०), बुलडाणा ३८.० (०.७), बह्मपुरी ४३.८ (३.३), चंद्रपूर ४४.८ (३.४), गोंदिया ४०.८ (०.६), नागपूर ४२.० (१.५), वाशीम ४०.०, वर्धा ४१.० (-०.२), यवतमाळ ४१.० (०.७). 
 


इतर अॅग्रो विशेष
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...