मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

rain
rain

पुणे: पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ८) विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर, उद्यापासून (ता. ९) मराठवाड्यात आणि सोमवारी (ता. १०) मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी (ता. ७) विदर्भातील नागपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भ, छत्तीसगड, ओडिशामध्ये वादळी पाऊस पडता आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर ५.९ मिलिमीटर, यवतमाळ १० मिलिमीटर, गोंदिया २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. ८) विदर्भात पावसाचा अंदाज असून, मंगळवारपर्यंत (ता. ११) राज्याच्या इतरही विभागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या तापमानातही चढउतार सुरूच असून, उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आल्याने गारठा अचानक वाढला. सोमवारपर्यंत (ता. १०) तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.१ (-१), नगर १२.२ (-१), धुळे ११.०, जळगाव १४.० (१), कोल्हापूर १५.५ (-१), महाबळेश्‍वर ९.९ (-४), मालेगाव १२.६ (१), नाशिक १०.० (-१), निफाड ७.८, सांगली १३.५ (-२), सातारा ११.४ (-२), सोलापूर १८.८ (१), अलिबाग १५.१ (-३), डहाणू १७.४ (०), सांताक्रूझ १४.२ (-३), रत्नागिरी १५.९ (-३), औरंगाबाद १६.४ (३), परभणी १७.४ (२), नांदेड १४.० (०), उस्मानाबाद १३.४ (-३), अकोला १६.५ (१), अमरावती १६.० (०), बुलडाणा १६.० (०), चंद्रपूर १५.५ (०), गोंदिया १५.०(०), नागपूर १५.८(१), वर्धा १५.८ (१), यवतमाळ १६.०(०). ---

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com