agriculture news in Marathi rain possibility in central Maharashtra and Marathwada Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघर्गनेसह पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

राज्यात उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. शुक्रवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. शुक्रवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावली. आज (ता.१८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, आणि विदर्भातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

विदर्भ मराठवाड्यात सर्वच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या वर गेले आहे. अकोला येथे देशातील उंच्चाकी व महाराष्ट्रातील यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, जळगाव, वाशिम चंद्रपूर येथेही तापमान ४२ अंशांच्या पुढे आहे. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, दिवससह रात्रीही उकाड्यात मोठी वाढ होत आहे. कमाल तापमान व उकाड्यात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. 

मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला असून, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात दुपारनंतर ढगाळ हवामान होत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज (ता.१८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.१, जळगाव ४२.६, धुळे ४२.०, कोल्हापूर ३५.८, महाबळेश्‍वर ३०.७, मालेगाव ४१.६, नाशिक ३९.०, निफाड ३९.०, सांगली ३७.६, सातारा ३७.६, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.२, सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३३.८, औरंगाबाद ४०.८, बीड ४१.२, परभणी ४१.८, अकोला ४३.९, अमरावती ४१.२, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.६, वाशीम ४२.२, वर्धा ४१.५. 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...