agriculture news in Marathi rain possibility in central Maharashtra and vidarbha Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर; तर बुधवारी (ता. २५) चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडणार आहे. 

पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर; तर बुधवारी (ता. २५) चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

अरबी समुद्रात असलेले कमी तीव्र दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील काही भागांत हवामान कोरडे झाले आहे. दोन ते तीन दिवसांपासून कमी झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली असल्याने काही भागात चांगलाच गारठा वाढला आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र व परिसरात चक्रीय स्थिती अजूनही कायम आहे. राज्यातील काही भागांत अजूनही अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात चढ-उतार झाले आहेत. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक असले तरी नाशिक, नगर, जळगाव महाबळेश्‍वर या भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. यामुळे या भागांत काहीसा गारवा असल्याने बोचरी थंडी असल्याची स्थिती आहे. 

विदर्भात काही अंशी कोरडे वातावरण असल्याने किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर गोंदिया, अमरावती, बुलडाणा या परिसरांत १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चढ-उतार असून, १५ ते २१ अंश सेल्सिअसच्या तापमान आहे. कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. यामुळे या भागात २१ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. 

शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २०.५ (-१), अलिबाग २१.५ (१), ठाणे २४, रत्नागिरी २३.५ (२), डहाणू २१.४, पुणे १९.३ (५), जळगाव १९ (५), कोल्हापूर २१.४ (४), महाबळेश्‍वर १७.१ (३), मालेगाव १७.६ (३), नाशिक १५.९ (२), निफाड १७.६, सांगली १८.६ (१), सातारा २१.५ (६), सोलापूर १८.६ (१), औरंगाबाद २०.३ (६), परभणी १९.६ (३), परभणी कृषी विद्यापीठ १९.०, नांदेड २१.० (५), उस्मानाबाद २१.० (६), अकोला २० (५), अमरावती १७.९ (१), बुलडाणा १७.६ (१), चंद्रपूर १८.० (३), गोंदिया १७.८ (२), नागपूर २१.२ (६), वर्धा १९.९ (४), यवतमाळ २१.५ (६). 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...