agriculture news in Marathi, rain possibility central Maharashtra, Marathwada, Kokan, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जुलै 2019

पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उडिसाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज (ता. १९) विदर्भाच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उडिसाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज (ता. १९) विदर्भाच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय नसल्याने कोकणात आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

उत्तर भारतात मॉन्सूनमुळे अमिनीदिवी, रोहटक, मिनीकॉय, दिल्ली, पालम, अल्फूझा या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर जम्मू आणि काश्‍मीर, हरियाना, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, झारखंड, उडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सध्या बंगालचा उपसागर, उत्तर प्रदेशाचा दक्षिण भाग, बिहार, झारखंड आणि उत्तर उडिसा या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर जम्मू आणि काश्‍मीर, राजस्थान, हरियाना या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे २० ते २५ जुलै या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागांत पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकणातील महाड, रत्नागिरी, वैभववाडी, मुरूड, पेण या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रातील आटपाडी, गगनबावडा, लोणावळा या ठिकाणी हलका ते मध्यम सरूपाच्या सरी बरसल्या. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. तर काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ हवामान तयार होत होते.

गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत - हवामान विभाग)
कोकण ः महाड ६०, रत्नागिरी, वैभववाडी ४०, मुरूड, पेण ३०, पोलादपूर, तला, म्हसळा, कणकवली, शहापूर, जव्हार, मुरबाड, कुडाल, राजापूर, खेड, सावंतवाडी, ठाणे २०, रोहा, मानगाव, वाडा, मंडणगड, भिरा, कल्याण, रामेश्वर, लांजा, संगमेश्वर देवरूख, देवगड, पालघर १०,
मध्य महाराष्ट्र ः आटपाडी ५०, गगनबावडा २०, लोणावळा १०,  मराठवाडा ः लोहारा ४०, मानवत २०, औसा २०, 
घाटमाथा ः कोयणा ५०, खोपोली ४०, अंबोणे, तात्मिणी, शिरगाव ३०, डुंगरवाडी २०, वळवण, वानगाव, भिवपुरी, दावडी, ठाकूरवाडी, कोयाना (नवजा), खांड, भिरा १०.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...