agriculture news in Marathi rain possibility in east vidarbha Maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पुणे: मध्य भारतात पूर्वेकडून आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भ, छत्तीसगड, ओडिशामध्ये पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान झाले आहे. तापमानातील वाढीमुळे राज्यातील थंडीही गायब झाली आहे. आज (ता. ७) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (ता.८) मराठवाड्यातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे: मध्य भारतात पूर्वेकडून आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भ, छत्तीसगड, ओडिशामध्ये पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान झाले आहे. तापमानातील वाढीमुळे राज्यातील थंडीही गायब झाली आहे. आज (ता. ७) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (ता.८) मराठवाड्यातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक परिसरावर हवेचा कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार कमी झाला आहे. तर पूर्वेकडील बंगालचा उपसागर व पश्‍चिमेकडील अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम होत असल्याने ढगाळ हवामान निर्माण होऊन पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

आज (ता. ७) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा विजा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुलडाणा, वाशीम वगळता उर्वरित विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. निफाड वगळता सर्वच ठिकाणी तापमान १० अंशांच्या पुढे असल्याने गारठा कमी झाला आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहेत. 

गुरुवारी (ता. ६) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये): पुणे १३.८ (२), नगर १६.१ (३), धुळे ११.४, जळगाव १५.२ (३), कोल्हापूर १८.४ (२), महाबळेश्‍वर १४.५ (१), मालेगाव १५.० (४), नाशिक १२.३ (१), निफाड ९.५, सांगली १८.३ (३), सातारा १५.५ (२), सोलापूर २०.२ (३), अलिबाग १८.४ (४), डहाणू १५.७ (-२), सांताक्रूझ १७.६ (०), रत्नागिरी १७.८ (-१), औरंगाबाद १५.७ (२), परभणी १७.९ (२), नांदेड १४ (०), अकोला १६.५ (१), अमरावती १५.२ (-१), बुलडाणा १६.६ (१), चंद्रपूर १६.८ (१), गोंदिया १५.६ (१), नागपूर १६.२(-१), वर्धा १७.४ (३), यवतमाळ १८.४ (२).


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...