राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. १९) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १६) कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडला. गुजरातला लागून असलेल्या उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे २१६ मिलिमीटर, तर पालघर येथे २३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वसई येथे १०१ मिलिमीटर, माथेरान येथे १३७, भिवंडी येथे १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. तर विदर्भ, मराठवाड्यात बहुतांशी भागात पावसाची उघडीप होती.    रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : डहाणू २१६, पालघर २३८, तलासरी ९६, वसई १०१, विक्रमगड ७५, भिरा ९५, कर्जत ५१, खालापूर ५९, माथेरान १३७, म्हसळा ६५, सुधागडपाली ५४, अंबरनाथ ६९, भिवंडी १५०, कल्याण ८२, उल्हासनगर ६३. मध्य महाराष्ट्र : साक्री २७, चाळीसगाव २४, गगणबावडा ५४, पन्हाळा २५, राधानगरी २९, अक्कलकुवा २२, हर्सूल ४८, इगतपुरी २७, नाशिक २८, ओझरखेडा ३३, पेठ ६७, वडगाव मावळ २६, महाबळेश्वर ५२. मराठवाडा : बीड ३०, निलंगा ३४, लोहारा २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com