agriculture news in Marathi, rain possibility form tommorow, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. १९) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १६) कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. १९) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १६) कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडला. गुजरातला लागून असलेल्या उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे २१६ मिलिमीटर, तर पालघर येथे २३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वसई येथे १०१ मिलिमीटर, माथेरान येथे १३७, भिवंडी येथे १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. तर विदर्भ, मराठवाड्यात बहुतांशी भागात पावसाची उघडीप होती.  

 रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :
कोकण : डहाणू २१६, पालघर २३८, तलासरी ९६, वसई १०१, विक्रमगड ७५, भिरा ९५, कर्जत ५१, खालापूर ५९, माथेरान १३७, म्हसळा ६५, सुधागडपाली ५४, अंबरनाथ ६९, भिवंडी १५०, कल्याण ८२, उल्हासनगर ६३.
मध्य महाराष्ट्र : साक्री २७, चाळीसगाव २४, गगणबावडा ५४, पन्हाळा २५, राधानगरी २९, अक्कलकुवा २२, हर्सूल ४८, इगतपुरी २७, नाशिक २८, ओझरखेडा ३३, पेठ ६७, वडगाव मावळ २६, महाबळेश्वर ५२. मराठवाडा : बीड ३०, निलंगा ३४, लोहारा २०.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...
उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे...जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार...
सरपंच, उपसरपंचांचे  मानधन आता ऑनलाइन पुणे : राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन...
राजापुरात भातावर लष्करी अळीरत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या...
मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची...सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५...
‘ऑक्टोबर हीट’ने महाराष्ट्र तापला पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’...