agriculture news in Marathi, Rain possibility form Wednesday, Maharashtra | Agrowon

बुधवारपासून पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

पुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू असतानाच, अद्यापही राज्यातून मॉन्सून परतलेला नाही. परतीसाठी पोषक हवामान असल्याने येत्या आठ दिवसांत मॉन्सून महाराष्ट्राचा निरोप घेण्याचे संकेत आहेत. यातच बुधवारपासून (ता. १६) राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू असतानाच, अद्यापही राज्यातून मॉन्सून परतलेला नाही. परतीसाठी पोषक हवामान असल्याने येत्या आठ दिवसांत मॉन्सून महाराष्ट्राचा निरोप घेण्याचे संकेत आहेत. यातच बुधवारपासून (ता. १६) राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या पावसाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह काही भागांत उघडीप दिली आहे. राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारपासून विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यातही कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे.

पावसाची उघडीप असलेल्या भागात तापमानाचा पारा तिशीपार गेल्याने ऑक्टोबर हीटचा चटका जाणवत आहे. काही भागात सकाळच्या असह्य उन्हानंतर दुपारी ढग दाटून येत असल्याने उकाडा वाढत आहे. तर सांयकाळी हलक्या सरी पडत असल्याने तापमान कमी होत असून, पहाटे धुके पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर डहाणू येथे ३४.५, तर जळगाव येथे ३४.२ अंश तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

रविवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.९ (०.३), जळगाव ३४.२(-०.८), कोल्हापूर ३०.६(-०.४), महाबळेश्वर २५.३(०.२), मालेगाव ३३.२ (-०.१), नाशिक ३१.० (-१.३), सातारा ३०.७ (०.२), सोलापूर ३२.७ (-०.३), अलिबाग ३३.३ (१.३), डहाणू ३४.५ (२.२), सांताक्रूझ ३५.४ (२.७), रत्नागिरी ३३.७ (२.५), औरंगाबाद ३०.८ (-१.३), परभणी ३२.५ (-०.५), नांदेड ३१.५, अकोला ३३.७ (-०.२), अमरावती ३३.८ (०.०), बुलडाणा ३०.६ (-०.२), चंद्रपूर ३३.२(-०.२), गोंदिया ३२.५(-०.३), नागपूर ३३.६ (०.५), वर्धा ३३.० (-०.३), यवतमाळ ३२.५(०.१).

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : कर्जत ३२, माथेरान ३५, पनवेल ५७, उल्हासनगर २०. मध्य महाराष्ट्र : श्रीगोंदा २४, जामखेड १२, जुन्नर १४, जत १०, खटाव १२. मराठवाडा : आंबाजोगाई २७, लातूर २४, रेणापूर १०, हादगाव ११, परांडा १५.  विदर्भ : एटापल्ली १०. 

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...