agriculture news in Marathi, rain possibility in Kokan and central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दक्षिण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली, रत्नागिरी येथे २८०, तर राजापूर येथे २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. 

काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात अधूनमधून काही सरी येत आहेत. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दक्षिण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली, रत्नागिरी येथे २८०, तर राजापूर येथे २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. 

काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात अधूनमधून काही सरी येत आहेत. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यातील केळेये-मजगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. धामणसे-ओरी आणि केळ्ये येथे रस्ता खचल्याने वाहतूक खंडित झाली आहे. हवामान विभागाकडील नोंदीनुसार रत्नागिरीत २८० मिलिमीटर तर महसूल विभागाकडील नोंदीनुसार रत्नागिरी २१२ मिलिमीटर पाऊस पडला.

 राजापूर येथे २५० मिलिमीटरची नोंद झाली. पावसामुळे सोमवारी रात्री मिरजोळे-पाटीलवाडी येथे पाणी भरले, तर शिळकडे जाणार मार्गही बंद झाला. पावसामुळे केळेये येथे नदीचे पाणी पुलावरून वाहत होते. भांडरपुळे येथेही पाणी भरल्याने गणपतीपुळेकडे जाणार मार्ग बंद झाला होता. 
मॉन्सूनचा आस बुधवारपर्यंत (ता. २४) दक्षिणेकडे सरकणार आहे. तर शुक्रवारपर्यंत (ता. २६) बंगालच्या उपसागरात उत्तर भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होऊन, गुरुवारपासून (ता. २५) पाऊस वाढणार आहे. अरबी समुद्रात किनाऱ्यालगत ढगांची दाटी झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस पडण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : रत्नागिरी २८०, राजापूर २५०, दोडमार्ग १४०, लांजा, गुहागर प्रत्येकी १२०, कणकवली, देवगड प्रत्येकी ९०, हर्णे ८०, सावंतवाडी, वैभववाडी प्रत्येकी ७०, मुरूड, संगमेश्वर, अलिबाग प्रत्येकी ५०, कुडाळ, तळा, मालवण, माणगाव, वेंगुर्ला प्रत्येकी ३०. 
मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ८०, खंडाळा ६०, जत, अकोले प्रत्येकी ३०, हर्सुल, चंदगड, जवळीमेढा, सातारा, पन्हाळा प्रत्येकी २०.
 

इतर अॅग्रो विशेष
गैरकृत्यांवर नियंत्रण गरजेचेचनिवडणुकीच्या रणधुमाळीत काही विषय मागे पडतात. कारण...
प्रयोगशील, प्रगतिशील शेतीत रमलेले जाधव...नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे...
आर्थिक प्रगती युवकाने निवडला फूलशेतीचा...बी.कॉम, एमबीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या पाठी न...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
दूध पावडर अनुदानाचा प्रस्ताव फेटाळलापुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना...
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गुरुवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारापुणे : राज्यात वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली...
राज्यातील कांदा उत्पादकांना ५५० कोटींचा...नाशिक ः दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला...
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधारसोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला...
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...