agriculture news in Marathi, Rain possibility in Kokan and Central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाडा व विदर्भात ऊन सावल्याचा खेळ सुरू असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. तर घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १७) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान अंशतः ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या श्रावण सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाडा व विदर्भात ऊन सावल्याचा खेळ सुरू असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. तर घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १७) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान अंशतः ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या श्रावण सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या आठवड्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. चालू आठवड्यातही पावसाचा जोर कमीच होता. मराठवाडा व विदर्भात मधूनमधून हलक्या सरी बरसत असल्या तरी अनेक ठिकाणी पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात माथेरान, पनवेल, सावंतवाडी येथे राज्यातील सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर घाटमाथ्यावरील ताम्हिणी, कोयना, शिरगाव, डुंगरवाडी, अंबोणे, कोयना (पोफळी) येथे जोरदार पाऊस पडला.
    
सध्या केरळ ते कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच गुजरातच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३.६ आणि ४.५ किलोमीटर या दरम्यान आहे. त्याचा काही प्रमाणात परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून कोकण, मध्य महाराष्ट्र व खान्देशात हवामान ढगाळ आहे. त्यामुळे काही ठिकाणी कमी अधिक पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात पोषक वातावरण नसल्याने पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. 

कोकणातील खालापूर, मडगाव, जव्हार, पेडणे, चिपळून, कुडाळ, माणगाव, म्हापसा, मोखेडा, मुरबाड, पोलादपूर, शहापूर, वेंगुर्ला, वाडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. महाराष्ट्रातील गगनबावडा, लोणावळा, महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस पडला. तर अक्कलकुवा, इगतुपुरी, नवापूर, पन्हाळा, पौड, मुळशी, त्र्यंबकेश्वर, चांदगड, जामनेर, खेड, राजगुरुनगर, पेठ, राधानगरी, तळोदा येथे हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील उस्मानाबाद, तुळजापूर येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील मौढा येथे ३० मिलिमीटर पाऊस पडला. तर धारनी, गोंदिया, भामरागड, नांदुरा, कामटी, बार्शीटाकळी, मुलचेरा, तुमसर, लाखणी, उमरेर, चिखलदरा, पातूर येथे हलका पाऊस पडला.  

शुक्रवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)  
 कोकण ः माथेरान, पनवेल, सावंतवाडी ६०, खालापूर, मडगाव ५०, जव्हार, पेडणे ४०, चिपळून, कुडाळ, माणगाव, म्हापसा,
 मोखेडा, मुरबाड, पोलादपूर, शहापूर, वेंगुर्ला, वाडा ३०, बेलापूर, कणकवली, मंडणगड, म्हसळा, राजापूर, रोहा, सुधागड, पाली, तलासरी, वाल्पोई २०, अंबरनाथ,  भिवंडी, डहाणू, गुहागर, हर्णे, कल्याण, कर्जत, खेड, लाजा, महाड, मालवण, मुरूड, पालघर, पेण, रत्नागिरी, संगमेश्वर देवरूख, ठाणे, वैभववाडी, वसई, विक्रमगड १०. 
 मध्य महाराष्ट्र ः गगनबावडा, लोणावळा, महाबळेश्वर ४०, अक्कलकुवा, इगतुपुरी, नवापूर, पन्हाळा, पौड, मुळशी, त्र्यंबकेश्वर ३०, चांदगड, जामनेर, खेड, राजगुरूनगर,  पेठ, राधानगरी, तळोदा २०, आजरा, हरसूल, नंदुरबार, ओझर, ओझरखेडा, शहादा, शाहुवाडी, शिराळा, सुरगाणा १०. 
मराठवाडा ः उस्मानाबाद, तुळजापूर १०. 
 विदर्भ ः मौढा ३०, धारनी, गोंदिया २०, भामरागड, नांदुरा, कामटी, बार्शीटाकळी, मुलचेरा, तुमसर, लाखणी, उमरेर, चिखलदरा, पातूर १०.  
 घाटमाथा ः ताम्हिणी ९०, कोयना (नवजा) ८०, शिरगाव, डुंगरवाडी ६०, अंबोणे, कोयना (पोफळी) ५०, लोणावळा (टाटा), वळवण ३०, शिरोटा, भिवपुरी, खोपोली, खंद २०, 
 वाणगाव १०.


इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...