कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाची शक्यता

पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता.३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता.३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. तर उद्या (ता.१) कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून आसामपर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनाऱ्यालगतच्या उपसागरात ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच हवेच्या खालच्या थरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.३१) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com