agriculture news in Marathi, rain possibility in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात माॅन्सून सक्रिय झाला आहे. घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्या नाल्यांना पूर आल्याने धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. आज (ता. १२) कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात माॅन्सून सक्रिय झाला आहे. घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्या नाल्यांना पूर आल्याने धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. आज (ता. १२) कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. राजस्थान, पंजाबच्या काही भागांसह संपूर्ण देश व्यापण्यास आणखी काही काळ लागणार आहे. दरम्यान, आसाम, मेघालय, गोवा, कोकण, अरुणाचल,  उत्तरप्रदेश या राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. 

राज्यात गुरुवारी (ता. ११) सकाळच्या चोवीस तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 
लोणावळ्यात सर्वाधिक पाऊस लोणावळा येथे सर्वाधिक २९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर लोणावळा शहरात ३०१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. कोकणातील माथेरान व दावडी, ताम्हिणी या घाटमाथ्यावर सर्वाधिक २३० मिलिमीटर पाऊस पडला. तर पेण, शिरगाव, डुंगरवाडी येथे २१० मिलिमीटर आणि वळवण येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. }

गुरुवारी (ता. ११) सकाळी साडे आठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत - हवामान विभाग) कोकण ः माथेरान २३०, पेण २१०, कर्जत १८०, भिरा १५०, मानगाव, खेड १४०, वेगुर्ला १३०, मोखाडा, दोडामार्ग, शहापूर, वाडा ११०, पनवेल १००, लांजा ९०, चिपळून, तळा, रोहा, कुडाळ ९०, सुधागड पाली, अलिबाग, पोलादपूर, जव्हार, श्रीवर्धन, मुलदे, विक्रमगड ८०, उरण, कुलाबा, हर्णे, पालघर, कल्याण, सावंतवाडी, मंडनगड, कणकवली, महाड, उल्हासनगर, मुरबाड ७०, मुरूड, ठाणे, वैभववाडी ६०, मालवण, भिवंडी, डहाणू, सांतक्रुझ, राजापूर, रत्नागिरी, गुहागर ५०,  मध्य महाराष्ट्र ः लोणावळा २९०, इगतपुरी १७०, राधानगरी १४०, त्र्यंबकेश्वर १३०, महाबळेश्वर १२०, पौड, वडगाव ११०, गगनबावडा ९०, चंदगड ७०, खेड ७०, जावळीमेढा ५०, पन्हाळा ५०, नेवासा, पाटण, भोर ४०, गारगोटी, हरसूल, गडहिंग्लज, पुणे शहर, जुन्नर ३०. मराठवाडा ः गंगापूर ६०, औरंगाबाद ३०, परतूर ३०, अंबड ३०, वैजापूर, पैठण, सोयगाव २०. घाटमाथा ः दावडी, ताम्हिणी २३०, शिरगाव, डुंगरवाडी २१०, वळवण २००, अंबोणे १९०, खोपोली, खांड १७०, ठाकूरवाडी, कोयना (नवजा) १५०, शिरोटा १४०, वानगाव १३०, कोयना (पोफळी) १२०, धारावी ९०, भिवापुरी ७०,

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...