agriculture news in Marathi rain possibility in Kokan and central Maharashtra Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

निसर्ग चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे: निसर्ग चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

निसर्ग चक्रीवादळामुळे बाष्प ओढून नेल्याने विदर्भ, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुख्यत: कोरडे हवामान आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली उतरला असून, तापमानात चढ-उतार होत आहेत. शनिवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विदर्भात कमाल तापमान ३२ ते ३९ अंश, मराठवाड्यात ३२ ते ३७ अंश, मध्य महाराष्ट्रात २३ ते ३६ अंश आणि कोकणात २९ ते ३५ अंशांदरम्यान आहे. आज (ता.७) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

शनिवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) : कोकण : सांताक्रुझ ६५, जव्हार ५६, मोखेडा ३२, पालघर ३२, वसई ५९, विक्रमगड ३५, वाडा ३४, पनवेल ३१, देवगड ३५, आंबरनाथ ६६, भिवंडी ४०, कल्याण ३०, शहापूर ८१, उल्हासनगर ५३. 
मध्य महाराष्ट्र : कोपरगाव ६३, राहता २९, राहुरी २३, श्रीरामपूर २१, अक्कलकुवा २४, हर्सूल १९, सटाना २४, घोडेगाव २१.
मराठवाडा : फुलंब्री १७. विदर्भ : लाखणी १६, साकोली १५, गोरेगाव १८.


इतर अॅग्रो विशेष
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोयाबीन बियाणे नापासचे प्रमाण ६५ टक्केपरभणी: परभणी येथील कृषी विभागाच्या बीज...
‘पणन’च्या सुविधा केंद्रातून ६४८ टन...नाशिक: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या भेंडी...
कृषी खाते म्हणते, पुरेशी खते उपलब्धपुणे: राज्यात खताची टंचाई नाही. मात्र, यंदा...
देशातून आत्तापर्यंत साखरेची ४८ लाख टन...कोल्हापूर: देशातून आत्तापर्यंत ४८ लाख ६९ हजार टन...
खत ‘आणीबाणी’ने शेतकरी त्रस्तपुणेः खरिपाची पेरणी झाल्यानंतर पिके बहारात असून...
खरेदी बंद; शेतकऱ्यांचा मका घरातच औरंगाबाद : आधारभूत किमतीने सुरु असलेली मका खरेदी...
धीरज कुमार यांनी कृषी आयुक्तपदाची...पुणे: राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
देशात खरिपाची पेरणी ५८० लाख हेक्टरवरपुणेः देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...