agriculture news in Marathi rain possibility in Kokan and central Maharashtra Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर शक्य  

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत असल्याने राज्यात आजपासून (ता.१३) पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा, तर विदर्भ, मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत असल्याने राज्यात आजपासून (ता.१३) पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा, तर विदर्भ, मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर कोकण घाटमाथ्यावर सुरू असलेला पाऊसही ओसरला आहे. रविवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, वेंगुर्ला येथे सर्वाधिक १४१ मिलिमीटर, सावंतवाडी येथे १३४ मिलिमीटर, तर कुडाळ ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात पावसाने हलक्या ते मध्यम स्वरुपाची हजेरी लावली असली तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप होती.  

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारला असून, पूर्व भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बिहार आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती, गोव्यापासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १३) सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

रविवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये 
पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) 

कोकण : वसई ५६, विक्रमगड ३१, अलिबाग ३१, मुरूड ८४, रोहा ३३, श्रीवर्धन ३२, तळा ७१, गुहागर ३८, रत्नागिरी ३१, देवगड ४८, दोडामार्ग ३३, कणकवली ४६, कुडाळ ११५, मालवण ७२, सावंतवाडी १३४, वेंगुर्ला १४१, शहापूर ३४.
मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा ३०.
मराठवाडा : भोकर २०.  विदर्भ : भामरागड ३३.


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...